देशातील ‘या’ 8 राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज; दिल्लीत तर पारा…

देशाच्या काही भागात वादळासह पावसाच्या हालचाली दिसत आहेत. तर काही भागात पुन्हा उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 मे पासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गोव्यात उष्णतेची लाट पुन्हा सुरू होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली : देशाच्या काही भागात वादळासह पावसाच्या हालचाली दिसत आहेत. तर काही भागात पुन्हा उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 16 मे पासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गोव्यात उष्णतेची लाट पुन्हा सुरू होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    15 मे रोजी ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळच्या काही भागात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडला. दिल्लीत कडाक्याच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. या आठवड्यात दिल्लीतील पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

    आयएमडीनुसार, या संपूर्ण आठवड्यात दिल्लीचे कमाल तापमान 41 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. किमान तापमान 25 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. देशाची हवामान स्थिती हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, दक्षिण ओडिशा, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा, किनारी कर्नाटक, अंतर्गत तमिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.