Photo Credit-Social Media
बेंगलुरू, कर्नाटक: जगाला हादरवून सोडणाऱ्या कोविड-19 महामारीनंतर चीनमध्ये HMPV नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्यातच आता भारतातही HMPV विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण समोर आला आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलामध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे. एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसची पहिली केस बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. बेंगलुरूमध्ये 8 महिन्याच्या मुलामध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (एचएमपीवी) ची पुष्टी झाली आहे.
मुलाला सातत्याने ताप होत असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नियमित रक्त तपासणी दरम्यान या विषाणूची पुष्टी झाली. कर्नाटकमधील आरोग्य विभागाने या विषाणूचे प्रकार कळवलेले नाहीत, मात्र विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी नमुने पुणे पाठवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या 8 महिन्याच्या मुलाचा चीनमधील प्रवासाचा कोणताही इतिहास नाही. भारतात आढळलेला एचएमपीवी विषाणू वेगळा आहे. चीनमधील विषाणू आणि इथे आढळलेल्या विषाणूचे स्ट्रेन संबंधित आहेत का, याबाबतही अद्याप कोणतीही माहिती नाही.त्यामुळे हे नमुने पुण्यातील लॅबमध्ये पाठवले जाणार आहेत.
गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया
एचएमपीवी विषाणू काय आहे?
एचएमपीवी (ह्यूमन मेटान्यूमोवायरस) हे एक सामान्य श्वसन विषाणू आहे जो सर्व वयाच्या लोकांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. या विषाणूचा जास्त परिणाम वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांवर होऊ शकतो. विषाणू संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. या विषाणूच्या काही सामान्य लक्षणांमध्ये नाक गळणे, गळ्यात खवखव, डोकेदुखी, थकवा, खोकला, ताप आणि थंडी लागणे यांचा समावेश होतो.
गेल्या अनेक दशकांपासून एचएमपीव्ही विषाणू अस्तित्वात असल्याचे सांगितले जात आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये याची प्रथम ओळख झाली. श्वसन रोग असलेल्या मुलांच्या नमुन्यांमध्ये विषाणूची पुष्टी झाली. एचएमपीव्ही हा पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबातील विषाणू आहे. हा विषाणू सर्व ऋतूंमध्ये हवेत असतो. संक्रमित लोकांच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्याने याचा प्रसार होतो. हिवाळ्यात त्याचा अधिक प्रसार होण्याचा धोका असतो. तथापि, तज्ञ म्हणतात की एचएमपीव्ही विषाणू 1958 पासून मोठ्या प्रमाणावर पसरला होता.
IND vs AUS : गंभीर आणि आगरकर घेणार काही मोठे निर्णय? भारतीय संघात होणार बदल
कोरोनासारखी लक्षणे
उच्च ताप आणि खोकला
श्वसनाचा त्रास
फुफ्फुसाचा संसर्ग
अनुनासिक रक्तसंचय
घशात घरघर
संपर्काद्वारे पसरतो
चीनमध्ये एचएमपीवी विषाणूच्या प्रकोपाच्या बातम्यांनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्र सरकार सर्व उपलब्ध माध्यमांद्वारे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि डब्ल्यूएचओकडून वेळोवेळी माहिती मिळवण्याची विनंती केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, एचएमपीवी चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढवली जाईल आणि भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) संपूर्ण वर्षभर एचएमपीवीच्या पसरलेल्या प्रमाणावर लक्ष ठेवणार आहे.