पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा कोलकात्यातील कालीघाट मंदिरात प्रार्थना केली आणि दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन केले (फोटो सौजन्य - एक्स)
Amit Shah Kolkata visit : बंगाल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवरात्रीनिमित्त पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. कोलकाता येथे पोहोचल्यावर, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटच्या वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्वागत केले. अमित शाह हे कोलकाता येथील कालीघाट मंदिरात प्रार्थना करणार असून ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमच्या भव्य दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन करणार आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथील पवित्र कालीघाट मंदिरात प्रार्थना करून होईल. त्यानंतर, ते संतोष मित्रा स्क्वेअर येथील दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन करतील.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सैन्याला समर्पित पंडालचे उद्घाटन
या वर्षी, दुर्गा पूजा पंडालची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे. या मार्फत भारतीय सैन्याच्या शौर्य आणि बलिदानाला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यासारख्या प्रमुख लष्करी व्यक्तींचे फोटो देखील पंडालमध्ये प्रदर्शित केले जातील. आयोजन समितीने याला “देशभक्तीने प्रेरित श्रद्धांजली” असे वर्णन केले आहे.
During Navratri, West Bengal radiates a special energy and joy. Today in Kolkata, inaugurated the Santosh Mitra Square Durga Puja pandal and offered prayers to Maa Durga. May her blessings bring well-being to all. নবরাত্রির এই পবিত্র সময়ে পশ্চিমবঙ্গ ভরে ওঠে এক বিশেষ উদ্দীপনা ও… pic.twitter.com/GXPwwLbpRl — Amit Shah (@AmitShah) September 26, 2025
नवरात्रीवर बंगालच्या सांस्कृतिक राजकारणात प्रवेश
अमित शाह यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कोलकातामध्ये पोहोचलो. पश्चिम बंगालचे दुर्गा पंडाल असोत किंवा गुजरातचे गरबा रास, संपूर्ण देश मोठ्या उत्साहाने देवीच्या पूजेचा उत्सव साजरा करत आहे.” अमित शाह यांची भेट केवळ धार्मिकच नाही तर राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जाते, विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा मानला जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजपची निवडणूक रणनीतीही तीव्र
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या अगदी आधी, भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना पश्चिम बंगाल निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त केले. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब यांना सह-प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. या निर्णयावरून असे दिसून येते की भाजप आता बंगालमध्ये निवडणूक तयारी गांभीर्याने घेत आहे आणि नवरात्रोत्सवासारख्या धार्मिक प्रसंगांचा वापर जनतेशी जोडण्याचे साधन म्हणून करत आहे.भाजप नेते सजल घोष म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पंडालचे उद्घाटन होणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे बंगालची संस्कृती आणि राष्ट्रवाद एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते.”