Photo Credit- Social Media ( विनेश फोगाटच्या तुटलेल्या मनाला कुणी उभारी दिली)
हरयाणा: कुस्तीत नशीब आजमावल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट आता राजकारणाच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहे. हरयाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून विनेश निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. पॅरिस ऑम्पिकमधून अपात्र झाल्यानंतर ती खूपच खचली होती, दुखावली होती. पण काही दिवसांतच पुन्हा उभी राहिली. कुस्तीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विनेश आता राजकारणात आपले नशीब आजमावना दिसत आहे. पण हा काळ तिच्यासाठी इतका सोपा नव्हता. आपल्याला या दु:खातून कुणी बाहेर काढले, आपल्याला कशी उभारी दिली याबाबत विनेशने स्वत:च खुलासा केला आहे.
“एक वेळ अशी आली की मन दुखावले गेले आणि देश सोडून कुठेतरी जावेसे वाटले, पण प्रियंका (प्रियंका गांधी वाड्रा) दीदींनी मला धीर दिला. ती लढत कधी संपली नाही आणि कधी संपणारही नाही.आपण ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी जावे यात प्रिंयका दीदींची सर्वात मोठी भूमिका होती आणि त्यांच्यामुळेच मी तिथे खेळण्यासाठी जाऊ शकले.
हेही वाचा: आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचे निधन, अभिनेता आईसह पोहचला राहत्या घरी!
पॅरिस ऑलिम्पिकनंतरच्या कालावधीचा संदर्भ देताना विनेश फोगाट म्हणाली, “त्यानंतर मी दीदी (प्रियांका गांधी वाड्रा) यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की माझे मन दुखावले आहे आणि आता मला देश सोडून दुसरीकडे जावेसे वाटते. पण “दीदींनी (प्रियांका गांधी) मला एक वैयक्तिक गोष्ट सांगितली. जेव्हा त्यांच्या वडिलांसोबत (राजीव गांधी) हे घडले तेव्हा त्यांनाही वाटले की त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही.
प्रियांका दीदींनी मला सांगितले की काही वाईट लोकांमुळे संपूर्ण देश चुकीचा होऊ शकत नाही. तेव्हा दीदींनी मला कुस्तीचे काय करायचे विचारले. मग मी म्हणाले मी पुन्हा त्या मॅटवर जाऊ शकणार नाही. त्यावर तू त्या मॅटवर पुन्हा जिंकशील असे त्यांनी मला सांगितले. त्या दिवशी एक तुटलेली मुलगी त्या खोलीत गेली होती. पण बाहेर आली तेव्हा ती दुर्गा होती.
हेही वाचा: मुलगी झाली हो…! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी झाले दुसऱ्यांदा आई- बाबा…
आम्ही जंतरमंतरवर लढत होतो, तेव्हा काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुडा आमच्याकडे आले होते. आजही ते इथेच बसले आहे. त्यावेळी आमची मुलगी ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी ते आले होते. तो लढा कधीही पूर्ण झाला नाही आणि हा लढा कधीही पूर्ण होणार नाही, असेही विनेश फोगाटने सांगितले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना विनेश फोगाट म्हणाली, “मी राहुल गांधी आणि पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानू इच्छिते. या नेत्यांकडून मला जे प्रेम आणि आशीर्वाद मिळाले आहेत ते संपूर्ण देशाने दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने या देशाच्या तुटलेल्या मुलीचा सांभाळ केला आहे.
हेही वाचा: अवकाशात इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरू होता; दुसरीकडे इस्त्रायली जोडप्याचे लग्न, पाहा व्हायरल