भारताने तयार केले ध्वनी मिसाईल (फोटो- istockphoto)
1. भारताने तयार केला ‘ध्वनी’ मिसाईल
2. तब्बल 7400 कीमी प्रतीतास असणार वेग
3. ‘ध्वनी’ मिसाईल स्वदेशी बनावटीचे
Dhvani Missile: भारत गेल्या काही वर्षांपासून संरक्षण क्षेत्रात मोठे काम करत आहे. संरक्षण प्रणाली अत्यंत मजबूत आणि अत्याधुनिक स्वरूपाची करण्यावर भारताने जोर दिला आहे. त्यातच भारत स्वदेशी हत्यारांची निर्मिती करण्यावर भर देत आहे. भारताने आता ‘ध्वनी’ मिसाईल तयार केले आहे. हे मिसाईल ब्राम्होस मिसाईलपेक्षा घातक असणार आहे.
भारत त्यांच्या हायपरसोनिक मिसाईल्समध्ये वेगाने प्रगती करत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ‘ध्वनी’ नामक स्वरूपाच्या अत्याधुनिक मिसाईल तयार केले आहे. याचे परीक्षण लवकरच होणार आहे. या मिसाईलचा वेग 7400 प्रती तास इतका असणार आहे. हे मिसाईल भारत-रशियाच्या ब्रह्मोस मिसाईलपेक्षा अधिक घातक आहे.
ध्वनी मिसाईलचे परीक्षण हे या वर्षाच्या अखेरपर्यन्त होण्याची शक्यता आहे. या मिसाईलमुळे भारताची ताकद वाढणार आहे. ध्वनी मिसाईल हे एचएसटीडीवी प्रोग्रॅमवर आधारित आहे. 2020 मध्ये एचएसटीडीवीने स्क्रेमजेट इजिनचे यशस्वी परीक्षण केले होते. आता ध्वनी हे मिसाईल तयार करण्यात आले आहे.
ध्वनी मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 6 पट अधिक आहे. यामुळे शत्रूला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच मिळणार नाही. हे मिसाईल समुद्र, जमीन आणि हवेतून शत्रूवर डागता येते. याच मारक क्षमता 1500 कीमी इतकी आहे. शेजारील शत्रू राष्ट्रासाठी हे मिसाईल एक इशारा असणार आहे. जर भारताविरुद्ध कोणतीही चुकीची कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर भारत देखील सक्षम आणि तयार असल्याचे या मिसाईलच्या निर्मितीमधून दिसून येत आहे.