१० मार्गांवर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, महाराष्ट्रातील या मार्गांचा समावेश
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसचा आनंद केवळ दिवसाच नाही तर रात्रीच्या प्रवासातही घेता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशभरात १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची योजना आखली आहे. त्यात दिल्ली- मुंबई आणि दिल्ली-पुणे या महाराष्ट्रातील दोन मार्गांचा समावेश असणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या गाड्या बनवण्याची जबाबदारी बीईएमएल कंपनीकडे सोपवण्यात आली आहे आणि या वर्षाच्या अखेरीस त्या रेल्वे बोर्ड यावर अंतिम शिक्कामोर्तब करेल. मंत्रालयाला तंत्रज्ञान आणि सोयीच्या बाबतीत या गाड्या जागतिक दर्जाच्या असाव्यात या कमतरता जाणवू नये अशी यात तरतूद केली जाणार आहे.
चालवण्याबाबत प्रस्ताव देण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. गाड्या उपलब्ध होतील, त्याप्रमाणे रेल्वे बोर्ड निर्णय घेईल. प्रत्येकाला स्लीपर वंदे भारत आपल्याकडे यायला हवी, असे संबंधित रेल्वे मंडळांचे म्हणणे आहे. सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद आणि नागपूर-इंदूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. त्यात नव्या दोन एक्स्प्रेसची भर पडणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रेल्वे मंडळाने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यात पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगावचा समावेश होता.
धनवीन वंदे भारत स्लीपर गाड्या केवळ दिसण्यातच खास नसतील, तर त्यांच्या आतील भागामुळे प्रवाशांना प्रीमियम फील मिळेल. या गाड्या ऑस्टेनिटिक स्टेनलेस स्टीलच्या बनवल्या जातील आणि त्यामध्ये प्रगत क्रॅश सेफ्टी तंत्रज्ञान वापरले जाईल. प्रत्येक टेनमध्ये १६ डबे असतील, ज्यामध्ये एकूण ८२३ प्रवाशांसाठी बसण्याची आणि झोपण्याची व्यवस्था असेल. डब्यांमध्ये फर्स्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी श्रेणी असतील.
वंदे भारत स्लीपर ट्रेन तीन कंपन्या बनवत आहेत. या कंपन्या म्हणजे बीईएमएल, काइनेट रेल्वे सॉल्यूसन्स लिमिटेड आणि टिटागड रेल्वे सिस्टम्स लिमिटेड आणि भेल यांचा संयुक्त उपक्रम असणार आहेत. भारतीय रेल्वेला या तीन कंपन्यांकडून एकूण २१० वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळतील.