भारताने हाणून पाडला पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
पठाणकोट: कालपासून पाकिस्तान भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान जम्मू-काश्मीर, पोखरण, भूज, पठाणकोट, राजौरी अशा ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताने हे हल्ले परतवून लावले आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. आजसुद्धा पाकिस्तानने भारताच्या जम्मू काश्मीर आणि पठाणकोट एअरबेसवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे .
पाकिस्तानकडून सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. त्यासोबतच पंजाब, राजस्थान, गुजरातमध्ये ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केला आहे. मात्र भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. सध्या भारतीय सुरक्षा दले अलर्ट मोडवर आहेत. पठाणकोट एअरबेस सुरक्षित आहे. तसेच ड्रोन हल्ल्यात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही अशी माहिती समोर येत आहे.
जम्मू काश्मीरच्या कुपवडा आणि राजौरीमध्ये पाकिस्तान भरपूर गोळीबार करत आहे. भारत देखील याला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये घुसून काउंटर अटॅक देखील केला आहे. अमृतसरमध्ये देखील गोळीबार सुरू आहे.
‘हा’ व्यक्ती पाकिस्तानला भारतापासून वाचवणार?
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. काल पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक देखील केला. भारतीय नौदल, हवाई दल, वायुसेनेने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला चढवला. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची स्थिती खराब केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान मैदानात उतरले असल्याचे समजते आहे.
भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते. आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे मैदानात उरतल्याचे म्हटले जात आहे.
India Vs Pakistan War Live: सांबा सेक्टरमध्ये BSF ची मोठी कारवाई; 7 दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नावज शरीफ हे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ आहेत. नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या काही बैठकांमध्ये सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. नवाज शरीफ यांचे भरतासोबत चांगले संबंध आहेत. भारत आणि पाकिस्तान यांचे सबंध चांगले व्हावेत अशी त्यांची देखील इच्छा असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे आता या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नवाज शरीफ हे पाकिस्तानला वाचवणार का हे पहावे लागणार आहे. भारताने हवाई दल, नौदल आणि लष्कर तीनही दलांनी पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.