पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे. पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला करून काउंटर अटॅक केला. आता पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत- पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरु आहे.
पाकिस्तानने Fattah-1 क्षेपणास्त्राद्वारे पाकने भारतावर हल्ला केला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस, बियास एअर बेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला
गेले दोन दिवस भारतावर पाकिस्तानकडून भ्याड ड्रोन हल्ले करत आहे. त्याला चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तनमधील रावळपिंडी शहर मध्यरात्री स्फोटांनी हादरल्याची माहिती समोर आली.
पाकचे महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त
पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. नूर खान, रफिक आणि मुरिद एअरबेस भारताकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. भारताकडून पाकिस्तानमधील चार विमानतळांवर हल्ले करण्यात आले. पाकिस्तानकडून देशातली सारी विमानतळं बंद करण्यात आली आहे. दुपारी बारापर्यंत देशभरातली हवाई वाहतूकच पाकिस्तानने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून पहाटे 3.15 वा.पासून हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पाकिस्तानकडून २६ शहरांना करण्यात आलं लक्ष्य
पाकिस्तानकडून भारतातील 26 ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराची महत्वाची ठिकाणी आणि नागरिक वस्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हल्ला परतवून लावला.पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सीमेवर हायअलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीत महत्वाच्या बैठका सुरू आहेत.
India Vs Pakistan War Live: श्रीनगर ते गुजरात अन्…; 26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ