छत्तीसगडमध्ये नक्षलवादी ठार (फोटो - सोशल मीडिया)
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश
दोन कुख्यात नक्षलवादी ठार
बिजापूर जिल्ह्यात मोठी कारवाई
छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे. दोन कुख्यात नक्षलवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणेला मोठे यश आले आहे. मार्च 2026 पर्यन्त नक्षलवाद नष्ट करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. त्यादृष्टीने सुरक्षा यंत्रणा जोरदार कारवाई करत आहे. बिजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.
छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन कुख्यात नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या परमानंत शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. तसेच 20 ते 30 किलो आयईडी जप्त केले आहे. सुरक्षा दलाने एके 47 बंदूक, एक पिस्तूल जप्त केली आहे.
छत्तीसगडच्या बिजापूर जिओळहयात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलाला नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले. अद्याप चकमक सुरू असून, या भागात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती समोर येत आहे.
12 नक्षलवाद्यांचा खात्मा
गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा यंत्रणेने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचा निर्धार केला आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणेला मोठे यश आले आहे. या भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत 12 नक्षलवादी ठार झाले असल्याचे समोर आले आहे. सुकमा जिल्हयापाठोपाठ बिजापूर जिल्ह्यात देखील दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. सुकमा आणि बाजूच्या परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. छत्तीसगडमधील बस्तर परिसरात चकमकीत 14 नक्षलवादी ठार झाले आहेत.
नक्षलवाद संपणार! CPI टॉप कमांडर गणेशला कंठस्नान; ‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश
तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांचे एक पथक नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निघाले होते. त्यानंतर गोळीबार सुरू झाला. या परिसरात मोठी चकमक झाली. त्यात आतापर्यंत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत.
‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश
६९ वर्षीय कमांडर गानेश्वर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत गणेशसह चार नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. ओडीशा पोलिसांचे नक्षलवादी ऑपरेशनचे डीआयजी यांनी या ऑपरेशनबद्दल माहिती दिली.






