सुरक्षा दले आणि नक्षलवादी चकमक (फोटो- सोशल मिडिया)
रायपूर: गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा यंत्रणेला नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे यश प्राप्त झाले आहे. आज देखील सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने नक्षलवाद मूळापासून नष्ट करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड हेच सरकारचे लक्ष्य आहे. आज सुरक्षा दलांनी 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत 2 जवान शहीद झाले आहेत. तर अन्य 2 जवान जखमी झाले. आतापर्यंतचे सुरक्षा दलांचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात कारवाई केली गेली तर केंद्र सरकारचे हे लक्ष्य यशस्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात भीषण धुमश्चक्री गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्ण देशातून संपवण्याचा निर्णय केंद्र सरकारने ठेवला आहे. त्यासाठी सुरक्षा दलांना कारवाईसाठी मोकळीक देण्यात आली आहे.
हेही वाचा: Chhattisgarh Naxal killed : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; १२ नक्षलवादी ठार
IED स्फोटात 9 जवान शहीद
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आले. IED स्फोटात 9 जवान शहीद झाले आहेत. 6 हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांचे पथक ऑपरेशन करून परतत होते.
दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन दल ऑपरेशननंतर परतत असताना नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर हा हल्ला केला. दुपारी 2:15 वाजता, नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. विजापूरमधील या हल्ल्याने संपूर्ण राज्य हादरले आहे. सोमवारी कुत्रू भागात नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या चिलखती वाहनाला लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनावर आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवानही गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. बस्तर रेंजच्या आयजींनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा: Breaking: विजापूरमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, IED स्फोटात 9 जवान शहीद, अनेक गंभीर जखमी
आयजी बस्तर पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी विजापूरमध्ये आयईडी स्फोटाने सुरक्षा दलांची वाहने उडवून दिली. या हल्ल्यात आठ डीआरजी जवान आणि दंतेवाडातील एका चालकासह नऊ जवान शहीद झाले. सुरक्षा दल दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर येथे संयुक्त कारवाई करून परतत होते. दंतेवाडा, विजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागात गेल्या तीन दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. यामध्ये ५ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून आमचा एक जवान शहीद झाला आहे. त्यानंतर आमची टीम परतत असताना विजापूरच्या आंबेली भागात नक्षलवाद्यांनी आयईडी पेरली होती, त्यामुळे आमच्या सुरक्षा दलाच्या वाहनाला धडक बसली. यामध्ये 8 जवान आणि एक चालक शहीद झाला.