चेन्नई: भारताने प्रदूषणावर नियंत्रण मिळविणासाठी देशात औष्णिक वीज निर्मितीपेक्षा आता आण्विक वीज निर्मितीवर भर दिला आहे. त्याअंतर्गत तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारतातील पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर पुढील वर्षी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या अणुभट्टीमुळे देशाच्या तीन टप्प्यांच्या अणुप्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू होईल, ज्याचा उद्देश अणुकचऱ्याचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करणे आहे. या अणुभट्टीची रचना आयजीसीएआर अर्थात इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राने केली आहे.
भारत सरकारने २००३ मध्ये भारतीय न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (भविनी) ला अणुभट्टी-प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर बांधण्यासाठी आणि चालवण्यासाठी मान्यता दिली. ही भारतातील पहिली छोटी अणुभट्टी आहे जी प्लुटोनियम-आधारित इंधन (मिश्रित ऑक्साईड) वापरेल आणि थंड करण्यासाठी द्रव सोडियम वापरेल. यामध्ये, सध्या वापरात असलेल्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स मधून मिळणारे इंधन देखील पुन्हा वापरले जाईल.
भिकाऱ्यांमुळे पाकची पुन्हा नाचक्की; सौदी अरेबियाने कारवाई करत ४,७०० जणांना पाठवले परत
२०२६ पर्यंत वीजनिर्मिती सुरू होईलः या अणुभट्टीची क्षमता ५०० मेगावॉट आहे. आणि ती अंतिम टप्प्यात असून त्यातून २०२६पर्यंत वीजनिर्मिती सुरू होण्याची अपेक्षा आहे. मार्च २०२४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रिॲक्टर व्हॉल्टला आणि रिॲक्टरच्या नियंत्रण कक्षाला भेट दिली. जुलै २०२४ मध्ये, अणुऊर्जा नियामक मंडळाने इंधन लोडिंग आणि प्रारंभिक चाचण्यांना मान्यता दिली होती.
भारताच्या अणुप्रकल्पात पीएफबीआर खूप महत्त्वाची भूमिका बजावेल कारण त्यातून तयार होणारे इंधन थोरियम-आधारित अणुभट्ट्यांच्या तिसऱ्या टप्प्यात वापरले जाईल. सरकारने १०० गिगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले ‘अणुऊर्जा अभियान’ देखील जाहीर केले आहे. सध्या भारताची अणुऊर्जा क्षमता ८.१६ गिगावॉट आहे.
याशिवाय, ७.३० गिगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारणे सुरू आहे. त्यानंतर, एनपीसीआयएल परदेशी सहकार्यातून १५.४० गिगावॅट, हलक्या पाण्याच्या अणुभट्ट्यांमधून १७.६० गिगावॉट आणि भविनी पीएफबीआरमधून ३.८० गिगावॉट वीज जोडेल. याशिवाय, खासगी क्षेत्राच्या सहकार्याने बांधले जाणारे छोट्या अणुभट्ट्या आणि नवीन तंत्रज्ञानाचे अणुभट्टया देखील यामध्ये योगदान देतील. यामुळे एकूण क्षमता ५५ गिगावॉट होईल






