पंजाब: देशाच्या सीमेवरुन घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफच्या जवानांनी अटक केली आहे. नेपाळ, बांग्लादेश व पाकिस्तानच्या सीमेवरुन अनेकजण घुसखोरी करण्याचा प्रयत्नांमध्ये असतात. मात्र भारतीय जवानांकडून त्यांची धरपकड केली जाते. मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी बॉम्बहल्लाच्या धमक्या येत असल्यामुळे सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. भारत पाकिस्तान सीमा ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफच्या जवानांनी पकडले आहे. बीएसएफने अटक केलेल्या व्यक्तीला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सध्या पंजाब पोलीस त्या व्यक्तीची चौकशी करत आहेत.
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुदासपूर जिल्ह्यातील ठाकूरपूर येथे भारत-पाकिस्तान सीमा ओलांडणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. मुहम्मद अब्दुल्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. बीएसएफने त्या पाकिस्तानी नागरिकाला पुढील तपासासाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मुहम्मद अब्दुल्ला पाकिस्तानच्या नरोवाल जिल्ह्यातील कोट नैना येथील रहिवासी आहे. सीमा ओलांडत असताना त्याला बीएसएफ जवानांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याच्याकडे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. त्याच्याकडून काही पाकिस्तानी चलन आणि ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला दोरंगळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हा पाकिस्तानी नागरिक अजाणतेपणे भारतीय हद्दीत घुसला होता. त्याच्याकडून काहीही आक्षेपार्ह आढळले नाही अशी माहिती दोरंगळा पोलिसांनी दिली.
मुंबई येथील डोंगरी विभागातील बाबा मस्जिदमध्ये काही दहशतवादी घुसल्याचा कॉल मुंबई पोलिसांना आला होता. तसेच पुण्यातील रुग्णालयामध्ये बॉम्ब असल्याचा कॉल देखील पोलिसांना आला होता. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नाही. पुणे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता एका माथेफिरूने हा कॉल केल्याचे समोर आले. या दोन्ही घटनांमुळे पोलीस सतर्क झाले आहेत. अशातच पाकिस्तानी नागरिकाला पकडण्यात आल्यामुळे पोलीस अधिक सावध झाले आहेत.