नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा (Indian Railway) डेटा हॅक (Data Breach) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) भारतीय रेल्वेच्या डेटा चोरीबाबत स्पष्टीकरण दिले. मात्र, आमचा कोणताही डेटा चोरीला गेला नाही, असे सांगण्यात आले आहे.
डेटा चोरीच्या संदर्भात, आयआरसीटीसीने सांगितले की, सर्ट-इनच्या (CERT-In) माध्यमातून भारतीय रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांच्या डेटा चोरीचा अलर्ट रेल्वेला देण्यात आला होता. यानंतर, आयआरसीटीसी सर्व्हरवरून कोणताही डेटा चोरी झाला नाही, असे आढळले. या प्रकरणी सर्व्हरची चाचणी (Server Test) घेण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक भागीदारांना देखील सूचित केले आहे.
भारतीय रेल्वेने सांगितले की, मीडियामध्ये रेल्वेतील डेटा चोरीच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर लगेचच रेल्वे बोर्डाने अलर्ट जारी करण्यात आले होते. या प्रकरणी तपास केल्यानंतर, असे आढळून आले की आयआरसीटीसीची हिस्ट्री एपीआयशी (API) जुळत नाही, म्हणजेच ते आयआरसीटीसी सर्व्हरशी संबंधित नाही. त्यानंतर आयआरसीटीसीकडून अधिक तपास करण्यात आला. आयआरसीटीसीच्या सर्व व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या डेटाची चोरी झाली आहे की नाही? हे शोधण्यासाठी त्वरित चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.