उत्तरप्रदेशातील ईश मोहम्मद यांनी बकरीईदच्या दिवशी बकरी ऐवजी स्वत: ची कुर्बानी दिली.
देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील उधोपूर गावात बकरी ईदच्या दिवशी घडलेली एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. ६० वर्षीय ईश मोहम्मद नावाच्या व्यक्तीने बकरीची कुर्बानी देण्याऐवजी स्वतःचाच गळा चिरून बलिदान दिले. गंभीर अवस्थेत त्याला गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Crime News: रांजणगाव गणपतीतील ‘या’ तिहेरी हत्याकांडाचा उलगडा; पोलिसांनी शर्थीने आरोपीला थोकल्या
ही घटना देवरियाच्या गौरी बाजार पोलीस ठाणे हद्दीत घडली. ईश मोहम्मद यांनी ईद-उल-अजहाची नमाज अदा केल्यानंतर घरी येऊन घराबाहेरच्या झोपडीत स्वतःचा गळा चिरला. ते सुमारे एक तास झोपडीत वेदनांत तडफडत होते. त्यांचा आक्रोश ऐकून कुटुंबीयांनी धाव घेतली आणि तात्काळ रुग्णालयात नेले. सुरुवातीला त्यांना देवरिया मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने पुढे त्यांना गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ईश मोहम्मद यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी नमूद केले की, “एखादा बकरी घरात मुलासारखी वाढवून तिची कुर्बानी दिली जाते. तीही एक जीव आहे. म्हणून मी स्वतःचे बलिदान देत आहे. मला कोणीही मारलेले नाही. माझ्या कबरीसाठी मी एक खांब लावलेला आहे, तिथेच मला दफन करा. शांततेत अंत्यसंस्कार करा. कोणाचीही भीती बाळगू नका.”
या घटनेबाबत माहिती देताना देवरियाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद कुमार वर्मा यांनी सांगितले की, यूपी ११२ वर मिळालेल्या फोनवरून गौरी बाजार परिसरात एका इसमाने गळा कापल्याची माहिती मिळाली. पोलिसांची पीआरव्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी इसमाला उपचारासाठी पाठवण्यात आले. प्राथमिक तपासात ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले असून, घटनेच्या इतर शक्यतेचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून, अधिकृतरित्या पंचनामा आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.