“मुलाला सर्व मालमत्ता दिली ही माझी मोठी चूक, मी सूनेच्या पाठीशी” ; गौतम सिंघानिया यांच्या वडिलांची खंत

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मुलाला सर्व संपत्ती देऊन चूक केल्याचे म्हटले आहे. गौतम यांनी स्वतःच्या पत्नी नवाज मोदी यांनाही घरातून हाकलून दिले त्यानंतर पहिल्यांदाच गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  रेमंडचे मालक गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या मुलाला सर्व संपत्ती देऊन चूक केल्याचे म्हटले आहे. गौतम यांनी स्वतःच्या पत्नी नवाज मोदी यांनाही घरातून हाकलून दिले त्यानंतर पहिल्यांदाच गौतम सिंघानिया यांचे वडील विजयपत सिंघानिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  पिता-पुत्राच्या नात्यातील कटुता बाहेर आली

  एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्या नात्यातील कटुता स्पष्टपणे दिसून आली. आपल्या मुलासाठी कटू शब्द वापरत त्यांनी मुलाने वडिलांना हाकलून दिल्याचे सांगितले. आता त्याने बायकोलाही हाकलून दिले. तो चांगला माणूस नसल्याचे ते म्हणाले. नवाज माझ्याकडे मदतीसाठी आली तर मी तिला पाठिंबा देईन. मी यापूर्वीही तिला सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता. गौतम कधीही नवाजला ७५ टक्के वाटा देणार नाही. “सब कुछ खरीदो और सबको खरीदो” हे त्याचे आयुष्याचे गणित असल्याचे त्यांनी सांगितले.

  मुलाने सर्व काही काढून घेतले

  ते म्हणाले की, मी माझा मुलगा गौतम सिंघानियाला सर्वकाही दिले. पण, त्याने माझ्याकडून सर्व काही काढून घेतले. मला माझे आयुष्य कसे तरी जगायचे होते. माझा काही व्यवसायही नाही. त्याने मला कंपनीतील काही हिस्सा देण्याचे आश्वासन दिले. पण, नंतर माघार घेतली. मला रस्त्यावर आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला असेल. गौतम हा अहंकारी माणूस आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करा, परंतु, सर्व मालमत्ता त्यांच्या ताब्यात देऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तुमच्या मृत्यूनंतर सर्व काही मुलांनाच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  2015 मध्ये विजयपत यांनी रेमंड आपल्या मुलाकडे सोपवले

  रेमंड कंपनी अंदाजे 123 वर्षांपूर्वी सुरू झाली. 1900 मध्ये, वाडिया मिल या नावाने महाराष्ट्रातील ठाणे येथे वूलन मिल म्हणून कंपनीचा पाया घातला गेला. 2015 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी त्यांचे सर्व शेअर्स आणि कंपनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानियाला दिली. यानंतर पिता-पुत्राचे नाते बिघडू लागले. फ्लॅटबाबत दोघांमधील वाद इतका वाढला की मुलाने वडिलांना बेघर केले. त्यांना भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावे लागले. मुलाने वडिलांची कार आणि ड्रायव्हर काढून घेतले. इतकेच नव्हे तर नावासोबत चेयरमन-एमेरिटस (निवृत्त अध्यक्ष) लिहिण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला.