मुंबई : देशभरात आज कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने देशासाठी बलिदान (Sacrifice For Country) दिलेल्या शूर सुपुत्रांच्या शौर्याचे स्मरण (Remembrance Of Bravery) केले जात आहे. कारगिल युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि युद्धातील विजयाचे स्मरण म्हणून दरवर्षी २६ जुलै हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ‘ऑपरेशन विजय’च्या (Operation Vijay) यशाचे प्रतीक मानला जातो.
भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध मे ते जुलै १९९९ पर्यंत चालले. ‘ऑपरेशन विजय’च्या माध्यमातून भारताच्या शूर सैनिकांनी कारगिल, द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी (Pakistani Terrorist) ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला. मातृभूमीचे रक्षण (Protecting Motherland) करताना ५०० हून अधिक भारतीय जवानांनी (Indian Army) बलिदान दिले. त्याच वेळी, युद्धादरम्यान तीन हजारपेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले.
२६ जुलै रोजी भारताच्या शूर जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावले. यानिमित्त ‘विजय दिवस’ साजरा केला जातो. ‘ऑपरेशन विजय’मध्ये भारताच्या अनेक शूर सैनिकांना प्राण गमवावे लागले, पण ते आपल्या जमिनीपासून मागे हटले नाहीत. कारगिल युद्धात हिमाचल प्रदेशचे ५२ जवान शहीद झाले होते.
पाकिस्तानने भारताविरुद्ध लष्करी मोहीम आखली होती. नियोजकांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि अन्य तीन जनरल मोहम्मद अझीझ, जावेद हसन, महमूद अहमद यांचा समावेश होता. कारगिल युद्ध (Kargil War) ३ मे रोजी सुरू झाले असले तरी २६ जुलै रोजी युद्ध संपले. अशा प्रकारे दोन्ही देश एकूण ८५ दिवस आमनेसामने राहिले. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील प्रत्यक्ष युद्ध ६० दिवस चालले, त्याला ‘ऑपरेशन विजय’ म्हणून ओळखले जाते.