अखेर डॉक्टरांच्या मागण्या मान्य करत अनेक अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या (फोटो सौजन्य : X)
कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कनिष्ठ डॉक्टरांचा संप अजूनही सुरु होते. मात्र डॉक्टरांच्या वाढत्या मागण्या आणि डॉक्टरांच्या असंतोषानंतर कोलकाताचे मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या सरकारने कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. गोयल यांच्या जागी मनोजकुमार वर्मा यांची कोलकाता पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉक्टरांची वाढती मागणी आणि असंतोष पाहता ममता बॅनर्जी यांच्या सरकारने कोलकाता पोलिसांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. सरकारने पोलीस आयुक्त विनीत गोयल यांना त्यांच्या पदावरून हटवले असून त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त म्हणून मनोजकुमार वर्मा यांची नियुक्ती केली आहे. आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येविरोधात अनेक कनिष्ठ डॉक्टर आंदोलन करत असताना ममता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मनोज कुमार वर्मा हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि सध्या ते राज्य पोलिसांचे ADG (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत होते. त्यांचा जन्म 1968 मध्ये राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे झाला. लोकसेवेत निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
मनोजकुमार वर्मा यांनी त्यांच्या कार्यकाळात कोलकाता पोलिसात अतिरिक्त आयुक्त म्हणूनही काम केले आहे. याशिवाय त्यांनी डीसीआय (स्पेशल), डीसीआय (ट्राफिक) या महत्त्वाच्या पदांवरही काम केले आहे. याव्यतिरिक्त, वर्मा यांनी पश्चिम मिदनापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून माओवादी कारवाया नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मनोज कुमार वर्मा यांची 2017 मध्ये सिलीगुडी पोलिस आयुक्तालय आणि दार्जिलिंगचे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जिथे त्यांनी कायदा व सुव्यवस्था यशस्वीपणे राखली होती. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांना 2017 मध्ये राज्य सरकारचे पोलिस पदक आणि 2019 मध्ये मुख्यमंत्री पोलिस पदक देण्यात आले.
कोलकाता पोलिस आयुक्तपदासाठी आणखी काही अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असली तरी अखेर मनोजकुमार वर्मा यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत कोलकाता पोलिस आयुक्तपद भूषविलेल्या विनीत गोयल यांना एडीजी (एसटीएफ) या पदावर पाठवण्यात आले आहे. यासोबतच राज्य आणि कोलकाता पोलिसांच्या इतर अनेक पदांमध्येही बदल करण्यात आले आहेत.