भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली (फोटो - सोशल मिडिया)
श्रीनगर: पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. पहलगाम हल्ल्यात 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारत सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. सिंधु जल करार स्थगित केला आहे. भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यातच आता भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीमेजवळ अनेक मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही देशांचे सैन्य सतर्क आहेत. दरम्यान सीमेजवळ असणाऱ्या काही जवळच्या भागातील हॉटेल्स रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान युद्ध कधीही सुरू होऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेलत्याचे म्हटले जात आहे.
एलओसीवरील सर्व हॉटेल्स रिकामे करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. भारत -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल करार स्थगित करण्यात आला आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यामागे ISI चा हात, NIA च्या रिपोर्टमध्ये काय?
पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. सुरुवातीच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. पहालगाम हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआयचा आणि पाकिस्तानी सैन्याचा हात असल्याचे समोर आले आहे.
पहालगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. तिथून ते आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधूनच निर्देश मिळत होते. पाकिस्तानमधूनच यांना या कृत्यासाठी पैसे पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे.
भारताच्या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट?
भारत पाकिस्तानवर हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्याचा दबदबा सरकारवर वाढल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या भीतीने पाकिस्तानमधील सर्व मोठे निर्णय सेनाच घेत असल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी सेना आणि सरकारमध्ये तणाव असल्याचे सांगितले जात आहे. आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांना पंतप्रधान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘न्यायाधीश हे काही…’; पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी, SC ने याचिकाकर्त्याला फटकारले
पाकिस्तान सैन्याचे प्रमुख जनरल असीम मुनिर देश सोडून पळून गेल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख परिवारासह देश सोडून गेल्याचे म्हटले जात आहे. तसेच रावळपिंडी येथील सैन्य मुख्यालयात लपले असल्याची चर्चा सुरू आहे. भारताने आक्रमक पावले उचलली असल्याने पाकिस्तानमध्ये भीतीदायक वातावरण आहे.
NIA च्या तपासात मोठा खुलासा
गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने अनेक महत्वाची पावले उचलून पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
Pahalgam Terror Attack: पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती ‘ही’ ठिकाणे; NIA च्या तपासात मोठा खुलासा
एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते.