सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका (फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकार देखील सतर्क झाले असून महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. पहलगाम हल्ल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने ही जनहित याचिका फेटाळून लावली आहे. त्याचवेळी याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले आहे. न्यायाधीश हे काही दहशतवादी प्रकरणाची चौकशी करणारे तज्ञ नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले.
Jammu Kashmir Industry : काश्मिरात कंपन्या तिप्पट वाढल्या, 370 हटवल्यानंतर तेजी, पहलगाममुळे धक्का
अशा प्रकारचा याचिका कोर्टात दाखल करून तुम्ही राष्ट्राची सुरक्षा कमकुवत करू इच्छित आहात का? असा सवाल सुप्रीम कोर्टात दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारला आहे. ही वेळ अत्यंत संवेदनशील आहे. जेव्हा संपूर्ण देशवासी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येत आहेत, तेव्हा अशा याचिका दाखल करण्याला काही अर्थ आहे का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला आहे.
पहलगाम नव्हे तर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती ‘ही’ ठिकाणे
एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते.
मात्र हल्ला करण्याच्या दृष्टीने 15 एप्रिल रोजीच दहशतवादी काश्मीरमध्ये दाखल झाले असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांना काही स्थानिक लोकांनी देखील मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यासाह आणखी 3 ठिकाणी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. बैसरन खोरे, अरू खोरे, एम्यूजमेंट खोऱ्यात देखील हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र तिथे असलेल्या सुरक्षेमुळे त्यांना हल्ला करता आला नाही.
22 एप्रिल रोजी टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पहालगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना मारण्याआधी त्यांना त्यांचा धर्म विचारून गोळी मारण्यात आली. या हल्ल्यात 5 दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. यामध्ये 2 स्थानिक आणि 3 पाकिस्तानी समावेश असल्याचे म्हटले जात आहे.
तपास यंत्रणेने आतापर्यंत अडीच हजारपेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. तर 188 जणांना ताब्यात घेतले आहे. 20 ओव्हर ग्राउंड कामगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. सिंधु जल करार स्थगित केला आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे.