भारतीय रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी म्हटली जाते. याच रेल्वेने दररोज कोट्यवधी प्रवासी ये-जा करत असता. रेल्वेकडून दररोज सुमारे 13 हजार गाड्या चालवल्या जातात. आपल्याला ही ट्रेनने प्रवास करायचा असेल तेव्हा आधी आपल्याला तिकीट काढावे लागते. जरी आता आपण ऑनलाइनकडे वळलो असलो, तरी सध्या घरबसल्या तिकीट खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तर दुसरीकडे ज्यांना ऑनलाइन तिकीट काढता येत नाही, ते तिकीट काउंटवरुनच तिकीट खरेदी करुन प्रवास करतात. कदाचित ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट किती महत्त्वाचे आहे, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. मात्र याचप्रवासादरम्यान तुमचे ट्रेनचे तिकीट कुठेतरी हरवले किंवा चुकले तर तुम्ही काय कराल? अशावेळी टिसीला न घाबरता रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही ट्रेनचा प्रवास करु शकता. कसं ते जाणून घ्या…
काय आहे नियम?
तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट हरवले असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. रेल्वेच्या नियमांनुलार तुम्हाला ट्रेनच्या TTE ला कळवावे लागेल. त्यानंतर TTE तुम्हाला डुप्लिकेट तिकीट देईल. हे तिकीट मूळ तिकीट सारखेच असेल. मात्र, हे तिकीट मूळ तिकिटापेक्षा वेगळे करणे सोपे आहे.
डुप्लिकेट तिकीटाची रक्कम
जर तुम्हाला TTE द्वारे डुप्लिकेट तिकीट जारी केले असेल तर हे तिकीट विनामूल्य नसेल. यासाठी तुम्हाला भारतीय रेल्वेला पैसे द्यावे लागतील. मात्र, त्यासाठी रेल्वेकडून मर्यादित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही स्लीपर क्लास किंवा सेकंड क्लासने प्रवास करत असाल तर तुम्हाला 50 रुपयांचे डुप्लिकेट तिकीट मिळेल.
इतर श्रेणींसाठी शुल्क किती आहे?
तुम्ही स्लीपर आणि सेकंड क्लास व्यतिरिक्त इतर कोणत्याही वर्गात प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट हरवले तर तुम्हाला त्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील, त्यानंतर तुम्हाला TTE कडून डुप्लिकेट तिकीट दिले जाईल.
तुमचे तिकीट फाटले तर काय नियम?
जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि तुमचे तिकीट फाटले तर तुम्ही तुमच्या प्रवास भाड्याच्या २५ टक्के भरून डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता. तथापि, येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट काढण्याची गरज नाही.






