Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : जगाची जीवनवाहिनी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा सुरु

Marathi Breaking Live Updates : जागतिक, राष्ट्रीय तसेच स्थानिक स्तरावर अनेक घडामोडींचा वेगवान आढावा...देश-विदेशसह राजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2026 | 06:07 PM
Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : मध्य-पूर्वेतील धगधगत्या तणावादरम्यान संपूर्ण जगाला मोठा दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. इराणने जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) हा जलमार्ग अखेर व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुला करण्याची घोषणा केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सईद अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, लेबनॉनमधील युद्धविराम लागू झाल्यानंतर हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयामुळे तणाव पूर्णपणे निवळला आहे असे म्हणणे घाईचे ठरेल, कारण अमेरिकेने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

जागतिक बाजारपेठेला ‘ऑक्सिजन’, तेलाच्या किमतीत घसरण

होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणे ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. जगातील एकूण तेल आणि वायू पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा याच मार्गातून होतो. हा मार्ग बंद झाल्याने जागतिक ऊर्जा सुरक्षा धोक्यात आली होती. मात्र, आता जहाजे पुन्हा सामान्यपणे प्रवास करू शकणार असल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे. यामुळे जगभरातील शेअर बाजारांनी मोठी झेप घेतली असून, मंदीचे सावट दूर होण्यास मदत झाली आहे.

The liveblog has ended.
  • 18 Apr 2026 05:45 PM (IST)

    18 Apr 2026 05:45 PM (IST)

    सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट!

    शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. सरकारने महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये २ टक्क्यांच्या वाढीला अधिकृतपणे मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात आणि निवृत्तांच्या निवृत्तीवेतनात (पेन्शनमध्ये) लक्षणीय वाढ होणार आहे.

  • 18 Apr 2026 05:30 PM (IST)

    18 Apr 2026 05:30 PM (IST)

    Akshay Kumar कोटींचा मालक, तरीही मुलगा का करतोय 4500 रूपयांची नोकरी?

    बॉलिवूडचा अॅक्शन स्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १७ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळत आहे. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारने त्याच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा केली. त्याने त्याचा मुलगा आरवबद्दलही सांगितले, जो वयाच्या १५ व्या वर्षापासून कुटुंबापासून दूर आहे. अक्षय कुमारने खुलासा केला की, त्याचा मुलगा नोकरी करतो आणि त्याचा सुरुवातीचा पगार ₹४,५०० आहे. तो आपल्या मुलाच्या कमाईवर खूप खूश आहे

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 18 Apr 2026 05:15 PM (IST)

    18 Apr 2026 05:15 PM (IST)

    जगाचा श्वास रोखला! होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद?

    अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) पुन्हा विकोपाला पोहोचला आहे. शनिवारी (१८ एप्रिल) ला इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या सागरी चाचेगिरी(लूटमार)ला प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा जागतिक तेल पुरवठा धोक्यात आला आहे.

  • 18 Apr 2026 05:02 PM (IST)

    18 Apr 2026 05:02 PM (IST)

    काश्मीर हादरलं! LoC वर लँड माइनचा धमाका

    जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पूंछ जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. एलओसीजवळ लँड माइनचा स्फोट झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एलओसीजवळ गस्त घालत असणारा एक अग्नीवीर जवान या स्फोटात जखमी झाल्याचे समोर येत आहे.

  • 18 Apr 2026 04:50 PM (IST)

    18 Apr 2026 04:50 PM (IST)

    'विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड नको'-मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

    सातारा सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्याच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारा विभाग आहे. या विभागामार्फत विविध शासकीय कार्यालये, इमारती, रस्ते व पूल आदी विकासकामे केली जातात. या सर्व पायाभूत सुविधा असून या कामांची गुणवत्ता व दर्जा याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

  • 18 Apr 2026 04:45 PM (IST)

    18 Apr 2026 04:45 PM (IST)

    अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला आंबा खरेदीसाठी गर्दी

    अक्षयतृतीयेच्या सणाला आमरसाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाला आंब्यांची खरेदी केली जाते. पण यंदा या सणावर महागाईचे सावट आहे. शहरातील प्रसिद्ध 'आहूजा आंबा पेढी' मध्ये नागरिकांनी सकाळपासूनच आंबा खरेदीसाठी रांगा लावल्या आहेत.

  • 18 Apr 2026 04:40 PM (IST)

    18 Apr 2026 04:40 PM (IST)

    "कराड चिपळूण रेल्वे मार्ग सुरु करा अन्यथा आंदोलन करू"

    जोपर्यंत कोकणवासियांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या इशाऱ्यानंतर रेल्वे विभागाने दादर चिपळूण गाडी सुरु करण्याची घोषणा केली. याबाबत त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कराड चिपळूण रेल्वेमार्ग सुरु व्हावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 18 Apr 2026 04:35 PM (IST)

    18 Apr 2026 04:35 PM (IST)

    घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर, ४२५ कर्मचाऱ्यांची सामूहिक सुट्टी, प्रशासन अडचणीत |

    कल्याण-डोंबिवलीत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर न मिळाल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन पुकारले असून शहरातील घनकचरा व्यवस्थापनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घनकचरा विभाग आणि केडीएमटीशी संबंधित सुमारे ४२५ कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेतल्याने अनेक भागांत कचरा उचलण्याचे काम ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उल्हास भोईर यांनी महापालिका प्रशासनाला इशारा देत, तातडीने पगार न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. परिस्थिती न सुटल्यास नागरिकांना स्वच्छतेच्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • 18 Apr 2026 04:30 PM (IST)

    18 Apr 2026 04:30 PM (IST)

    व्हायरल व्हिडीओवरून भाजप शिवसेना आमनेसामने

    भाईंदरमध्ये व्हायरल व्हिडिओवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. भाजप आमदारांच्या ठिय्या आंदोलनानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी त्यावर पलटवार केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. नवघर परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

  • 18 Apr 2026 04:25 PM (IST)

    18 Apr 2026 04:25 PM (IST)

    वसई-विरारचा होणार कायापालट

    वसई-विरार शहराचा कायापालट करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. शहर नियोजन अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी आयुक्तांनी विशेष समित्यांची घोषणा केली आहे. वसई-विरार शहर महापालिकेच्या हद्दीत विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • 18 Apr 2026 04:20 PM (IST)

    18 Apr 2026 04:20 PM (IST)

    कल्याणमध्ये महायुतीवर वरुण सरदेसाई यांचा जोरदार हल्लाबोल

    सत्ता पैसा गुंडगिरी समोर आमचे दहा नगरसेवक एकजूट राहिले जो सत्ता संघर्ष झाला त्याच्यावर एक नेटफिक्सचा शो होऊ शकतो सेना बीजेपीची कागदावर युती असली तरी त्याचे जमत नाही हे दिसून आले त्यामुळे सर्व समित्यांच्या निवडणुकीत दिरंगाई झाली आता विषय अजिंद्यावर घेऊन विरोधीपक्ष नेत्याचा विषय मिटला पाहिजे लवकरच उद्धवजी विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करतील एवढेच नाही तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या मधुर म्हात्रे बेईमानी करून त जनतेसमोर कशा फिरतात या शब्दात आमदार वरून सरदेसाई यांनी टीका केली आहे ,.ठाकरे सेनेचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या केडीएमसीतील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वरुण सरदेसाई कल्याणात आले होते.

  • 18 Apr 2026 04:15 PM (IST)

    18 Apr 2026 04:15 PM (IST)

    "कराड चिपळूण रेल्वे मार्ग सुरु करा अन्यथा आंदोलन करू"

    जोपर्यंत कोकणवासियांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी जाहीर केली होती. त्यांच्या या इशाऱ्यानंतर रेल्वे विभागाने दादर चिपळूण गाडी सुरु करण्याची घोषणा केली. याबाबत त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कराड चिपळूण रेल्वेमार्ग सुरु व्हावा यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 18 Apr 2026 04:10 PM (IST)

    18 Apr 2026 04:10 PM (IST)

    "नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार"

    वसई-विरार परिसरातील नालासोपारा पूर्व येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शांती लाईफ या इमारतीत एका महिलेला तिच्याच सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.नालासोपारा पूर्व येथील शांती लाईफ इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेवर तिच्याच सासरच्या मंडळींकडून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.सदर महिलेच्या म्हणण्यानुसार, सासू, सासरे, दोन नणंद, देवर आणि नणंदेचे पती असे कुटुंबीय गेल्या १३ वर्षांपासून दहेजाच्या पैशांसाठी तिला त्रास देत असून वारंवार मारहाण करत आहेत.

  • 18 Apr 2026 04:05 PM (IST)

    18 Apr 2026 04:05 PM (IST)

    काशिमिरा हादरलं! पुलाखाली झोपलेल्या ४० वर्षीय व्यक्तीची स्क्रू ड्रायव्हरने निर्घृण हत्या

    मीरा-भाईंदर शहरातील काशिमिरा परिसरात मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या नीलकमल नाका येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आले आहे. प्रकाश वाळुंज (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव असून, एका अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीकडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत प्रकाश वाळुंज हे नीलकमल नाका येथील पुलाखाली झोपलेले असताना, अज्ञात आरोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने स्क्रू ड्रायव्हरसारख्या धारदार हत्याराने त्यांच्या पोटात व डोळ्यात वार करत त्यांची निर्दयीपणे हत्या केली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 18 Apr 2026 03:55 PM (IST)

    18 Apr 2026 03:55 PM (IST)

    मंगळाच्या आशीर्वादाने तयार होत आहे रुचक योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

    मंगळ २ मे रोजी स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे स्थित्यंतर महत्त्वपूर्ण मानले जाते, कारण मंगळ ग्रह ऊर्जा, धैर्य आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. जेव्हा हा ग्रह स्वतःच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याची शक्ती आणि प्रभाव अनेक पटींनी वाढतो. अशा वेळी मेष राशीत मंगळाच्या प्रवेशाने रुचक योग तयार होणार आहे, जो पंच महापुरुष योगांपैकी एक अत्यंत प्रभावशाली योग मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा मंगळ स्वतःच्या राशीत, म्हणजेच मेष किंवा वृश्चिक राशीत किंवा उच्च राशीत असतो, तेव्हा हा विशेष योग तयार होतो. हा योग व्यक्तीला धैर्य, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि आर्थिक समृद्धी प्रदान करतो, असे मानले जाते.

  • 18 Apr 2026 03:50 PM (IST)

    18 Apr 2026 03:50 PM (IST)

    जपानमध्ये आता मराठी माणसाचा डंका! शार्प कंपनीत पुण्याच्या उद्योजकाने खरेदी केले ७५% शेअर्स

    जपानी तंत्रज्ञान आणि  शार्प टीव्हीने १९९० च्या दशकात भारतात घराघरांत अधिराज्य गाजवले आहे. या कंपनी संदर्भात एक मोठे वृत्त मिळाले आहे. या कंपनीची धुरा आता पुण्याच्या एका मराठी उद्योजकाच्या हाती आली आहे. पुण्याचे उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने जपानच्या शार्प इंडिया कंपनीसोबत ऐतिहासिक करार केला आहे. या करारांतर्गत ७५% शेअर खरेदी करण्यात आले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर दबदबा असलेली जपानी कंपनी आता मराठी विशेष करुन पुण्याच्या माणसाच्या मालकीची झाली आहे.

  • 18 Apr 2026 03:35 PM (IST)

    18 Apr 2026 03:35 PM (IST)

    “एक चूक अन्…” Akshay Kumar चे अपघाताचे थरारक अनुभव, शुटिंग दरम्यान 3 वेळा मृत्यूच्या उंबरठ्यावरुन…

    बॉलिवूडमधील खिलाडी कुमारने आपल्या करिअरची सुरुवात ॲक्शन चित्रपटांनी केली आणि आजही तीच शैली कायम ठेवली आहे. यामुळेच चाहते त्याला खरा ॲक्शन हिरो मानतात. मात्र, हा छंद त्याच्यासाठी अनेकदा धोकादायक ठरला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, चित्रीकरणादरम्यान तो तीन वेळा मृत्यूच्या दारातून थोडक्यात बचावला होता.

  • 18 Apr 2026 03:25 PM (IST)

    18 Apr 2026 03:25 PM (IST)

    राशिद खानच्या घरी ‘नवा पाहुणा’! स्टार क्रिकेटरला पुत्ररत्न प्राप्त; सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

    इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) रणधुमाळीत गुजरात टायटन्सचा हुकमी एक्का आणि अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर राशिद खान (Rashid Khan) याच्यासाठी एक सुखद आणि भावनिक क्षण समोर आला आहे. राशिद खानला पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी जगभरातील चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

  • 18 Apr 2026 03:20 PM (IST)

    18 Apr 2026 03:20 PM (IST)

    अक्षर पटेलने टॉस जिंकला; दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय

    आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. आज शनिवार असल्याने (IPL 2026) आज चाहत्यांना डबल हेडर सामने पाहायला मिळणार आहेत. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 18 Apr 2026 03:15 PM (IST)

    18 Apr 2026 03:15 PM (IST)

    अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत अंतिम मुदत

    राज्यातील अकरावी प्रवेशासाठी १० एप्रिलपासून सुरू झालेल्या केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब केला असून, अर्ज नोंदणीला प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच दोन लाख ६० हजार ५९५ हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्जाच्या ‘भाग-एक’ साठी नोंदणी केली आहे.

  • 18 Apr 2026 03:10 PM (IST)

    18 Apr 2026 03:10 PM (IST)

    इस्रायल माघार घेणार? लेबनॉनचा कायमस्वरूपी युद्धबंदीचा प्रस्ताव, जनतेला एकजुटीचे आवाहन

    एकीकडे अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा सुरु असून दुसरीकडे इस्रायल (Israel) लेबनॉनमध्येही युद्धबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते हे शांततेच्या दिशेने अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. लेबनॉनचे राष्ट्रपती जोसेफ आउन यांनी नुकतेच जनतेला एक आशेचा किरण दाखवला आहे. केवळ तात्पुरत्या युद्धबंदीसाठी नाही, कायस्वरुपी शांततेसाठी हालचाली सुरु असल्याचे संकेत जोसेफ यांनी दिले आहेत.

  • 18 Apr 2026 03:04 PM (IST)

    18 Apr 2026 03:04 PM (IST)

    गूढ मृत्यू की हत्या? परिचारिकेचा मृतदेह डॉक्टरच्या घराबाहेर; भयंकर घडलं

    राजस्थान येथून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला परिचारिकेचा मृतदेह डॉक्टरांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर संशयास्पद आढळल्याचे समोर आले आहे. मृत महिलेची ओळख अनिता मीणा अशी झाली आहे. त्या सीकर येथील रहिवासी आहे. त्या राजपुरा सामूहिक आरोग्य केंद्रात एएनएम (ANM) म्हणून तैनात होत्या. मंगळवारी सकाळी डॉक्टरांच्या शासकीय निवासस्थानाच्या पायऱ्यांवर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून एका डॉक्टरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

  • 18 Apr 2026 02:58 PM (IST)

    18 Apr 2026 02:58 PM (IST)

    युद्धापेक्षाही भयंकर ‘ब्लॅक रेन’चा विळखा! इराणमध्ये आकाशातून बरसतोय मृत्यू; तेल साठ्यांवरील हल्ल्यांनी निसर्गाचा कोप

    इराण (iran) आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता एका अशा वळणावर प्रवेश केला आहे, जिथे केवळ बॉम्ब आणि क्षेपणास्त्रेच नव्हे, तर निसर्गही माणसाचा शत्रू बनला आहे. मार्च २०२६ मध्ये तेहरान आणि आसपासच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर झालेल्या अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणमध्ये ‘ब्लॅक रेन’ म्हणजेच काळ्या पावसाने हाहाकार माजवला आहे.

  • 18 Apr 2026 02:52 PM (IST)

    18 Apr 2026 02:52 PM (IST)

    FBIचे ‘नशेत’ असलेले संचालक? Kash Patel यांच्या गंभीर चुकीमुळे अमेरिकेची सुरक्षा धोक्यात

    जगातील सर्वात शक्तिशाली तपास संस्था समजल्या जाणाऱ्या एफबीआय (FBI) मध्ये सध्या एक अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. संस्थेचे संचालक काश पटेल यांच्या वैयक्तिक सवयी आणि त्यांच्या नेतृत्वावर एका नव्या अहवालाने (The Atlantic Report) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

  • 18 Apr 2026 02:45 PM (IST)

    18 Apr 2026 02:45 PM (IST)

    10 वीच्या निकालांप्रमाणे, 12 वीचे निकालही लवकरच जाहीर होणार?

    एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, CBSE ने या वर्षी उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया आधुनिक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मंडळाने ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ म्हणजेच OSM प्रणाली लागू करण्याची तयारी केली आहे;

  • 18 Apr 2026 02:38 PM (IST)

    18 Apr 2026 02:38 PM (IST)

    राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा अलाहाबाद न्यायालयाचा आदेशानं खळबळ

    अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाच्या आदेशानंतर रायबरेली पोलिसांना राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. हे प्रकरण कथित दुहेरी नागरिकत्वाशी (ब्रिटिश नागरिकत्व) संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

     

  • 18 Apr 2026 02:27 PM (IST)

    18 Apr 2026 02:27 PM (IST)

    नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र गडगे भोंदूबाबाला अटक

    नाशिकमधील प्रकारानंतर संगमनेर तालुक्यात वडगावपान येथे 'दत्तधाम सरकार' नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून तो लोकांची फसवणूक करत होता. तक्रारीनंतर गुन्हा दाखल होऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

  • 18 Apr 2026 02:22 PM (IST)

    18 Apr 2026 02:22 PM (IST)

    खरातचा पाय खोलात, चौथ्या गुन्हात कोठडी, उद्या पुन्हा हजर करणार

    अशोक खरातला VC द्वारे हजर करण्यात आले. चौथ्या गुन्ह्यात 30 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पाचवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्या संदर्भात त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती वकिलांनी दिली आहे.

  • 18 Apr 2026 02:00 PM (IST)

    18 Apr 2026 02:00 PM (IST)

    नव्या नाट्यलहरीत हरवतेय ज्येष्ठांची किनार; नवे विषय, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रंगभूमीकडे तरुणांचा ओढा

    अलीकडील काही प्रायोगिक नाटकांच्या प्रयोगांना कॉलेजमधील विद्यार्थी, तरुण कलाकार आणि नवोदित दिग्दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित राहताना दिसतात. सामाजिक, मानसिक आणि समकालीन विषयांवर आधारित कथानक, तसेच सादरीकरणातील वेगळेपण ही या रंगभूमीची खासियत ठरत आहे. डिजिटल युगाशी सुसंगत असलेली ही मांडणी तरुणांच्या विचारविश्वाशी जोडली जात असल्याने त्यांचा प्रतिसाद वाढत आहे.

  • 18 Apr 2026 01:55 PM (IST)

    18 Apr 2026 01:55 PM (IST)

    ना फ्लिप, ना बुक-स्टाइल! Huawei बदलणार स्मार्टफोनचा ट्रेंड

    टेक कंपनी Huawei चीनमध्ये एक मोठा धमाका करणार आहे. या लाँचिंगनंतर स्मार्टफोनचा ट्रेंड बदलणार आहे. Huawei लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिप किंवा बुक-स्टाइल नाही तर यूनिक ‘वाइड’ फोल्डेबल असणार आहे. आगामी डिव्हाईस Pura X Max या नावाने लाँच केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 20 एप्रिल रोजी कंपनी त्यांचा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी Huawei Pura 90 आणि Pura 90 Pro Max लाँच करण्याची देखील तयारी करत आहे.

  • 18 Apr 2026 01:50 PM (IST)

    18 Apr 2026 01:50 PM (IST)

    ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक ; 17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

    शिराळा तालुक्यातील शिवणी धरणात केवळ 16 टक्के पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्याने कालव्याला पाणी सोडणे पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे शिराळा, खेड व शिवणी परिसरांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली आहेत. यावर्षी कमी पावसामुळे शिवणी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले सुमारे 15हेक्टर ऊसक्षेत्र सध्या धोक्यात आले आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शिवणी धरणात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून 330कूपनलिकांची पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यापैकी 35 कूपनलिकांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील 20 पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून उर्वरित तलावांमध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

  • 18 Apr 2026 01:45 PM (IST)

    18 Apr 2026 01:45 PM (IST)

    बाप रे! Akshaya Tritiya चा गोडवा महागला? बाजारपेठेत आंब्याची मोठी आवक

    उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण साजरा होत आहे. या दिवशी घराघरात आम्ररस-पुरीचा बेत आखला जातो. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 18 Apr 2026 01:35 PM (IST)

    18 Apr 2026 01:35 PM (IST)

    एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार!परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच बस स्थानकांवरील शौचालय सुविधा प्रवाशांसाठी येत्या १ जूनपासून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी येथे केली. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्याचबरोबर एसटी ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची भर टाकण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या सेवा वाढणार आहेत. याचसोबत एसटी स्थानकावरही प्रवाशांना स्वच्छतागृह मोफत वापरता येणार आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

  • 18 Apr 2026 01:30 PM (IST)

    18 Apr 2026 01:30 PM (IST)

    बालविवाह केल्यास आता होणार कैद; महाबळेश्वर प्रशासनाचा कडक इशारा

    महाबळेश्वरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सचिन मस्के यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बेकायदेशीर ठरतो. अशा विवाहात सामील होणाऱ्या प्रत्येक घटकावर कायद्याचा बडगा उगारला जाईल. यामध्ये केवळ वधू-वरांचे आई-वडील आणि नातेवाईकच नाही, तर लग्न लावणारे भटजी (पुरोहित), मंडप डेकोरेटर्स, मंगल कार्यालय मालक, वाजंत्री आणि अगदी लग्नाची पत्रिका छापणारे मुद्रक या सर्वांवर गुन्हे दाखल केले जातील. दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड अशी कठोर शिक्षा होऊ शकते.

  • 18 Apr 2026 01:25 PM (IST)

    18 Apr 2026 01:25 PM (IST)

    15 व्या क्रमांकावरून सरळ पहिल्या नंबरवर Shubman Gill ची झेप

    IPL 2026 च्या २५ व्या सामन्यात एक मोठा उलथापालथ पाहायला मिळाला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने केवळ आपल्या स्फोटक फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला नाही, तर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावून महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात, शुभमन गिलने ८६ धावांची शानदार खेळी करत सलग तिसऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संघाच्या सोप्या विजयात गिलच्या कर्णधारपदाच्या खेळीने महत्त्वाची भूमिका बजावली. 

  • 18 Apr 2026 01:20 PM (IST)

    18 Apr 2026 01:20 PM (IST)

    लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत

    मुंबईच्या वांद्रे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने होणाऱ्या नवऱ्याने प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ६० तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना वांद्रे येथील खेरवाडी येथे घडली.

  • 18 Apr 2026 01:15 PM (IST)

    18 Apr 2026 01:15 PM (IST)

    विजय देवरकोंडा-शौर्ययुव यांची नव्या प्रोजेक्टसाठी हातमिळवणी

    विजय देवरकोंडा आणि दिग्दर्शक शौर्ययुव एक नवीन मोठ्या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. हा चित्रपट फक्त भारतापुरता मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवला जाणार आहे.या प्रोजेक्टमध्ये जगभरातील उत्तम क्रिएटिव्ह आणि टेक्निकल लोकांचा एक खास ग्रुप आहे, ज्याला ‘ड्रीम कलेक्टिव’ असं नाव दिलं आहे.पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा एका वेगळ्या, ताकदवान अवतारात दिसतो. तो साखळ्यांनी बांधलेल्या कुत्र्यांसोबत पुढे चालताना दाखवला आहे, ज्यातून त्याचा आक्रमक आणि वेगळा लूक सूचित होतो.हा चित्रपट विजय देवरकोंडाचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि मोठ्या स्केलचा प्रोजेक्ट मानला जातो, ज्यात त्याचा पूर्णपणे नवीन अवतार पाहायला मिळणार आहे.

  • 18 Apr 2026 01:10 PM (IST)

    18 Apr 2026 01:10 PM (IST)

    शेख हसीना यांना भारत बांगलादेशच्या हवाली करणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय

    भारत आणि बांगलादेश या दोन शेजारी राष्ट्रांमधील राजनैतिक संबंध सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina), ज्यांनी गेल्या काही महिन्यांपासून भारतात आश्रय घेतला आहे, त्यांच्या प्रत्यार्पणाबाबत (Extradition) भारत सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. बांगलादेश सरकारने केलेल्या अधिकृत विनंतीचा आढावा घेण्यास भारताने सुरुवात केली असून, यामुळे दक्षिण आशियातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

  • 18 Apr 2026 01:02 PM (IST)

    18 Apr 2026 01:02 PM (IST)

    चिंचवडमध्ये टोळक्याचा राडा

    चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळक्याने राडा घातला आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ एप्रिल रोजी रात्री घडली असून याबाबत १६ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनुज अशोक भोईटे (वय २३), रोशन राजेंद्र राणे (वय २५), संकेत संजय शेळके (वय २७), अक्षय शरद चौधरी (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह कमलेश अशोक पाटील (वय २५), रोहित सयाजी जाधव (वय २५), अब्दुल्ला (वय १९, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज भिल्लू राठोड (वय ३४, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • 18 Apr 2026 12:48 PM (IST)

    18 Apr 2026 12:48 PM (IST)

    शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका

    राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश तसेच इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. सर्व शाळांना शासनाच्या ११ जून २००४ च्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर आणि प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिला आहे.

  • 18 Apr 2026 12:36 PM (IST)

    18 Apr 2026 12:36 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी

    पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली. सभेला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत शहरातील झोपडपट्टी व दाट वस्ती भागांमध्ये गटार, स्टॉर्म वॉटर लाईन, शौचालय दुरुस्ती आणि इमारतींची देखभाल यासारखी कामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहेत. निगडी- दापोडी, सांगवी-किवळे आदी प्रमुख मार्गांसह विविध प्रभागांतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

  • 18 Apr 2026 12:24 PM (IST)

    18 Apr 2026 12:24 PM (IST)

    धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला

    द्यप्राशन केलेल्या माथेफिरू प्रवाशाने बसमध्ये महिला कंडक्टरवर (वाहक) चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात महिलेच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरेखा बळीराम भालेराव (वय.38,रा. मुळशी, मुळ. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या कंडक्टर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, भालेराव यांनी बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.15) रात्री आठ वाजताच्या सुमारास अलंकार चौक परिसरात घडली आहे.

  • 18 Apr 2026 12:12 PM (IST)

    18 Apr 2026 12:12 PM (IST)

    एक ‘व्हॉट्सॲप कॉल’ अन् कारवाई ठप्प!

    पुणे शहरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईला अचानक ‘व्हॉट्सॲप कॉल’मुळे ब्रेक लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे पथक लोहगाव आणि धायरी परिसरात कारवाई करत असताना वरिष्ठांकडून आलेल्या संदेशानंतर कारवाई तात्काळ थांबविण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घडामोडींमुळे महापालिकेत राजकीय हस्तक्षेपाची जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 18 Apr 2026 11:30 AM (IST)

    18 Apr 2026 11:30 AM (IST)

    कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली! पण माल मोठ्या प्रमाणात आल्याने दरात घसरण

    कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीये साठी बाजारात आंब्याची आवक वाढली आहे.

  • 18 Apr 2026 11:30 AM (IST)

    18 Apr 2026 11:30 AM (IST)

    दिल्लीविरूद्ध आज होणार MSD ची एंट्री? कोचने दिली मोठी अपडेट, Thala खेळणार की नाही

    एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत फ्लेमिंग यांनी सांगितले की, धोनी पुनरागमनासाठी कठोर परिश्रम घेत आहे. प्रशिक्षकांनी धोनीच्या पुनरागमनाची तारीख किंवा सामना जाहीर केला नाही, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धोनीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी आली होती.

  • 18 Apr 2026 11:20 AM (IST)

    18 Apr 2026 11:20 AM (IST)

    नकोसं झालंय नवं तंत्रज्ञान! तरूणांमध्ये कमी होतेय AI ची क्रेझ? विश्वासही झाला कमी? या कारणामुळे भडकले यूजर्स

    सर्वात पहिले कारण म्हणजे एआयचा वापर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पद्धतींनी केला जात आहे. याची अनेक उदाहरण समोर आली आहे. डिपफेकपासून अगदी लोकांची फसवणूक करण्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतींनी एआय वापरला जातो. दुसरे कारण म्हणजे एआय सर्व कामं करू शकतात असा दावा नेहमीच केला जातो. म्हणजेच अगदी आर्टिकल लिहीण्यापासून गणितं सोडवण्यापर्यंत, एआय शिक्षकांपासून हॉटेलमधील मॅनेजरपर्यंत एआय सर्वकाही करू शकतो. यामुळेच भविष्यात नोकरीच्या संधी कमी होऊ शकतात आणि तरूणांच्या करीअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. याच कारणामुळे तरूणांमधील एआयची क्रेझ कमी होत असल्याचा दावा केला जात आहे.

  • 18 Apr 2026 11:10 AM (IST)

    18 Apr 2026 11:10 AM (IST)

    आता डायरेक्ट होणार Gas चा पुरवठा, देशात पसरणार 2500 किमी लांबीची एलपीजी पाइपलाइन

    पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) देशाच्या विविध भागांत पसरलेल्या २,५०० किलोमीटर लांबीच्या चार प्रमुख एलपीजी पाइपलाइनच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकल्पात अंदाजे १२,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. हे पाऊल का मोठे समजले जाते हेदेखील आपण आता जाणून घेऊया. बिझनेसच्या दृष्टीकोनातून आणि लोकांच्या हितासाठी हा निर्णय नक्कीच योग्य ठरू शकतो.

  • 18 Apr 2026 11:00 AM (IST)

    18 Apr 2026 11:00 AM (IST)

    लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी रेल्वे खात्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परळीतील माधवबाग परिसर हादरून गेला आहे. हा धक्कादायक प्रकार १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ वाजता घडला. या घटनेनं एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • 18 Apr 2026 10:50 AM (IST)

    18 Apr 2026 10:50 AM (IST)

    161 पदांवर भरती, निवृत्त उमेदवारांना संधी; पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया घ्या जाणून

    टेरिटोरियल आर्मी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण १६१ पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. ही संधी विशेषतः अनुभवी आणि सेवानिवृत्त उमेदवारांसाठी महत्त्वाची मानली जाते. भरती प्रक्रिया रॅलींच्या माध्यमातून आयोजित केली जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेला आणि ठिकाणी उपस्थित राहावे लागेल.  ही भरती रॅली ५ मे २०२६ ते २३ मे २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी आयोजित केली जाईल. उमेदवार त्यांच्या पद आणि ठिकाणानुसार निश्चित केलेल्या तारखांना सहभागी होऊ शकतात.

  • 18 Apr 2026 10:40 AM (IST)

    18 Apr 2026 10:40 AM (IST)

    धुळे हादरलं! 18 वर्षीय तरुणी दिवसाढवळ्या बेपत्ता; हात हवेत पण CCTV मध्ये

    धुळे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संजीवनी राहुल वराडे असं या तरुणीचे नाव आहे. ती बेपत्ता होतांनाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओत तीचा हात हवेत आहे, मात्र असं वाटत आहे की तिचा हात कोणी तरी ओढतंय. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगरात ती शेवटची दिसली. या घटनेने खळबळ उडालीय आहे.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news international news national news iran us war crime news war live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 09:16 AM

Topics:  

  • navarashtra breaking news
  • Navarashtra Live Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.