Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : Team India A लढणार आज दक्षिण आफ्रिकेशी

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 13, 2025 | 12:20 PM
LIVE
Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Follow Us
Close
Follow Us:
  • 13 Nov 2025 12:20 PM (IST)

    13 Nov 2025 12:20 PM (IST)

    लिफ्ट देण्यास नकार दिल्याने एकाची दोघांना बेदम मारहाण

    आता नागपूरच्या हुडकेश्वर भागातील स्वागतनगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लाकडी बल्ली आणि हेल्मेटने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा युवक गंभीर जखमी झाला असून, हुडकेश्वर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारी (दि.११) रात्री दहाच्या सुमारास ब्रम्हानगर, जुना नरसाळा मार्गावर घडली.

  • 13 Nov 2025 12:00 PM (IST)

    13 Nov 2025 12:00 PM (IST)

    अमेरिकेतील शट डाऊन अखेर संपला

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सरकार पुन्हा सुरू करण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन संपला आहे. 43 दिवसांचा हा अमेरिकेतील शट डाऊन अखेर संपला आहे.

  • 13 Nov 2025 11:55 AM (IST)

    13 Nov 2025 11:55 AM (IST)

    मला पत्नी मिळवू द्या; त्रस्त तरुणाचे शरद पवारांना पत्र

    अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने लग्न होत नसल्याने थेट जेष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिले असल्याचे समोर आले आहे. या तरुणाचे लग्न होत नसल्यामुळे त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना पत्र लिहून, 'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही', असे साकडे घातले आहे.

  • 13 Nov 2025 11:45 AM (IST)

    13 Nov 2025 11:45 AM (IST)

    काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत

    चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कासारा रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे.

  • 13 Nov 2025 11:35 AM (IST)

    13 Nov 2025 11:35 AM (IST)

    मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड

    मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची निवड करण्यात आली आहे. आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. तर सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला.

    MCA निवडणुकीत पवार-शेलार पॅनल तर्फे मी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा होतो.या निवडणुकीत मला मतदान करून विजयी करणाऱ्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो.तसेच या निवडणुकीत माझ्या सोबत उभे राहणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील मी आभार मानतो.
    येणाऱ्या काळात MCA च्या माध्यमातून क्रिकेट साठी… pic.twitter.com/LjjliK4kBS

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 12, 2025

  • 13 Nov 2025 11:22 AM (IST)

    13 Nov 2025 11:22 AM (IST)

    Delhi स्फोट झालेल्या गाडीत सापडलेल्या पायाचा DNA मॅच

    दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला. काही मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले होते. हे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते. फॉरेन्सिक पथकांनी हे सगळे अवयव गोळा करुन मृतांची ओळख पटवली. स्फोट झालेल्या गाडीमध्ये एक पाय सापडला होता. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. याठिकाणी डीएनए चाचणी (DNA Test) केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

     

  • 13 Nov 2025 11:12 AM (IST)

    13 Nov 2025 11:12 AM (IST)

    Delhi बॉम्बस्फोटचा अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

    दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण स्फोट झाला. यामध्ये 13 माणसांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा अतिशय ह्रदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चालत्या गाडीमध्ये झालेला स्फोट स्पष्टपणे दिसत आहे.

    #WATCH | Delhi | CCTV footage of the car blast near the Red Fort that claimed the lives of 8 people and injured many others.

    Source: Delhi Police Sources pic.twitter.com/QeX0XK411G

    — ANI (@ANI) November 12, 2025

  • 13 Nov 2025 11:02 AM (IST)

    13 Nov 2025 11:02 AM (IST)

    विकासाचे राजकारण साधणारे वसंतदादा पाटील यांची जयंती

    महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रगत दिशा देणारे वसंतदादा पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला वेगळे वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख आहे. आजच्या दिवशी 1917 रोजी त्यांचा सांगलीमध्ये जन्म झाला. मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात वसंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही त्यांचे कार्य राजकीय नेत्यांना प्रेरणा देतेय.

  • 13 Nov 2025 10:56 AM (IST)

    13 Nov 2025 10:56 AM (IST)

    कोटक महिंद्रा बँकेचा नवा नियम!

    कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांसाठी नवा नियम लागू केला आहे. 1 डिसेंबर 2025 पासून कोटक महिंद्रा बँकेच्या लाखो ग्राहकांना SMS सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क द्यावा लागणार आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बँकेच्या ग्राहकांना SMS अलर्टसाठी 15 पैसे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.​ याशिवाय, काही कार्डांवर नोव्हेंबरपासून डेबिट कार्ड शुल्क सुद्धा कमी केले आहे.

  • 13 Nov 2025 10:50 AM (IST)

    13 Nov 2025 10:50 AM (IST)

    कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कहर!

    कोल्हापुरातून अंधश्रद्धेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चुटकी वाजवून भूतबाधा काढण्याचा प्रयत्न होतांना या व्हिडिओत दिसत आहे. एवढेच नाही तर स्मशानभूमीत अघोरी पूजा. करणीचे देखील प्रयोग होत आहे. या व्हिडीओने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. याआधी देखील अंधश्रद्धेचे अनेक प्रकार समोर आले होते. समोर आलेल्या व्हिडीओ हा कोल्हापूर शहरातला असल्याचे सांगितलं जात आहे.

  • 13 Nov 2025 10:42 AM (IST)

    13 Nov 2025 10:42 AM (IST)

    अर्शदीप सिंगने घेतली Mercedes

    ऑस्ट्रेलियामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने स्वतःला एक अद्भुत भेट दिली आहे. टीम इंडियाच्या या तरुण स्टारने अलीकडेच एक नवीन मर्सिडीज-बेंझ जी-क्लास (जी-वॅगन) खरेदी केली. त्याने सोशल मीडियावर त्याच्या लक्झरी कारचा फोटो शेअर केला आणि चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. या कारची मूळ किंमत सुमारे ₹3 कोटी आहे, तर वैशिष्ट्ये आणि प्रकारांसह, त्याची ऑन-रोड किंमत सुमारे ₹4 कोटी आहे.

  • 13 Nov 2025 10:33 AM (IST)

    13 Nov 2025 10:33 AM (IST)

    15 नोव्हेंबरपासून बदलणार Toll Plaza चे नियम

    जर तुम्ही वारंवार महामार्गांवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. १५ नोव्हेंबर २०२५ पासून टोल प्लाझावर एक नवीन नियम लागू होणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. जर तुमच्या वाहनात FASTag नसेल किंवा टॅग खराब झाला तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तथापि, डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी सरकारने मोठी सूट जाहीर केली आहे.

  • 13 Nov 2025 10:25 AM (IST)

    13 Nov 2025 10:25 AM (IST)

    Trump आणि Sharaa यांचा ‘तो’ VIDEO VIRAL

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प( Donald Trump) यांनी वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसमध्ये सीरियाचे नव्याने नियुक्त झालेले नेते अहमद अल-शारा(Ahmed al-Sharaa) यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर त्वरीत व्हायरल झाला आहे.

    ‘How many wives? One?’ Trump asks Syria’s new leader in White House — video

    Trump gifted Al-Shaar perfume and went on to SPRAY him with it

    ‘This is the best fragrance! And the other one is for your wife’

    Al-Sharaa assured Trump he only has one wife. Vibe check passed, too pic.twitter.com/SAjO6Vc8GH

    — RT (@RT_com) November 12, 2025

  • 13 Nov 2025 10:14 AM (IST)

    13 Nov 2025 10:14 AM (IST)

    पहिल्या कसोटीचा थरार कधी, कुठे आणि कसा पाहता येणार?

    भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतीय चाहते विविध स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर घरी बसून थेट सामना पाहू शकतात. जर तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर सामना पहायचा असेल तर जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. चाहते येथे मोफत लाईव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

  • 13 Nov 2025 10:06 AM (IST)

    13 Nov 2025 10:06 AM (IST)

    दुर्दैवी! मुंबईमधील धक्कादायक प्रकार

    मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ नका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका तरुणाची दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव अमर आनंद पगारे (३०) असे आहे. आनंद पगारे हे नाशिकहून मुंबईत फिरण्यासाठी बुधवारी आले होते. आणि त्याच दिवशी 11 च्या सुमारास त्यांच्यावर काळाने घात केला.

  • 13 Nov 2025 09:58 AM (IST)

    13 Nov 2025 09:58 AM (IST)

    मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीवबार करत संपवलं

    पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे. ही हत्या का करण्यात आली, या मागचं कारण काय? चला जाणून घेऊयात?

    बातमी सविस्तर वाचा...

  • 13 Nov 2025 09:50 AM (IST)

    13 Nov 2025 09:50 AM (IST)

    रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळेणार की नाही?

    भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने अद्याप मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला देशातील ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिलेली नाही. विजय हजारे ट्रॉफी २५ डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान अहमदाबाद, राजकोट, जयपूर आणि बेंगळुरू येथे होणार आहे, तर नॉकआउट सामने बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील. भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागाची स्थिती अद्याप अस्पष्ट आहे.

  • 13 Nov 2025 09:45 AM (IST)

    13 Nov 2025 09:45 AM (IST)

    अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर

    रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यासाठी डिसेंबरमधील तारिखही निश्चित करण्यात आली आहे. रोसकाँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन ५ डिसेंबर रोजी भारतात येणार आहे. यावेळी ते रशिया-भारत फोरमच्या अधिवेशनात सहभागी होतील. अमेरिकेच्या दबावाला झुगारुन पुतिन यांचा हा दौरा होत आहे.

  • 13 Nov 2025 09:41 AM (IST)

    13 Nov 2025 09:41 AM (IST)

    निवडणुकीच्या तोंडावर अनेकांचे पक्षांतर

    राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी बहुतांश पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे.

  • 13 Nov 2025 09:35 AM (IST)

    13 Nov 2025 09:35 AM (IST)

    माळशिरस तालुक्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ ! अजित पवार अन् धवल मोहिते पाटलांची भेट

    महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. दोन्ही बाजूंनी सकारात्मक बोलणे झाले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुतीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात घड्याळाची टिकटिक वाढण्याची जबाबदारी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या समर्थ खांद्यावर पेलणार असल्याचे दिसते आहे.

  • 13 Nov 2025 09:33 AM (IST)

    13 Nov 2025 09:33 AM (IST)

    अमेरिकेची मोठी कारवाई

    इराणला क्षेपणास्त्रे विकसित करण्यास मदत केल्याचा आरोप असलेल्या कंपन्यांवर अमेरिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली. भारतासह सात देशांमधील 32 कंपन्या आणि संबंधित व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत. या देशांमध्ये चीन, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, तुर्की, इराण आणि इतर देशांचा समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले की, या संस्था आणि व्यक्ती इराणच्या क्षेपणास्त्र आणि मानवरहित हवाई वाहन (UAV) उत्पादनाला पाठिंबा देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय पुरवठा नेटवर्कचा भाग आहेत.

  • 13 Nov 2025 09:25 AM (IST)

    13 Nov 2025 09:25 AM (IST)

    IND A vs SA A वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची Live Streaming

    या मालिकेचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. याचा अर्थ प्रेक्षक कोणत्याही टीव्ही चॅनेलवर भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ सामने पाहू शकणार नाहीत. तथापि, स्ट्रीमिंग डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. सामन्यांचे थेट प्रक्षेपण JioHotstar अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. प्रत्येक सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल. क्रिकेट चाहत्यांसाठी डिजिटल हा एकमेव पर्याय असेल.

  • 13 Nov 2025 09:23 AM (IST)

    13 Nov 2025 09:23 AM (IST)

    पुणे हादरलं! मित्रांनीच व्यावसायिक मित्राला गोळीबार करत संपवलं

    पुणे येथील पिंपरी चिंचवडयेथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्रांनीच एका व्यावसायिक मित्रावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. यात ३७ वर्षीय नितीन शंकर गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील चऱ्होली अलंकापुराम चौकाजवळ ही घटना घडली आहे.

  • 13 Nov 2025 09:12 AM (IST)

    13 Nov 2025 09:12 AM (IST)

    दिल्ली आणि इस्लामाबाद स्फोटावर अमेरिकेचा दुहेरी चेहरा

    राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट (Delhi Blast) झाला होता. तर याच्याचय दुसऱ्या दिवशी मंगळवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथेही उच्च न्यायालाबाहेर स्फोट झाला होता. या स्फोटांनी दोन्ही देश हादरले होते. दरम्यान या स्फोटा अमेरिकेची (America) पहिलीच प्रतिक्रिया समोर आहे. मात्र यामध्ये अमेरिकेचा दुहेरपण समोर आला आहे.

Marathi Breaking News Updates : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु होण्याआधी भारताचा अ संघ हा एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राजकोट येथे खेळवली जाईल.

तिलक वर्मा यांच्या नेतृत्वाखालील ही मालिका भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एक महत्त्वाची तयारी मानली जाते. संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक आणि लाईव्ह स्ट्रीमिंग माहिती जाणून घ्या. ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या तयारीचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

यावेळी, चर्चा अधिकच वाढली कारण अशी अटकळ होती की रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी सामना तंदुरुस्ती मिळविण्यासाठी भारत अ संघासोबत खेळू शकतात. तथापि, बीसीसीआय निवड समितीने त्यांचा संघात समावेश केला नाही.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news national news crime news live updates international news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 09:06 AM

Topics:  

  • Marathi News Live Updates
  • navarashtra breaking news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.