Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: थोड्याच वेळात नितीश कुमार घेणार शपथ, 10 व्या वेळी भूषविणार बिहारचे मुख्यमंत्रीपद

रोजच्या घडामोडी तुम्हाला मिळतील एका क्लिकवर. देशातील, परदेशातील, गुन्ह्याच्या असो वा अन्य लाइफस्टाईल, क्रीडा बातम्या असोत तुम्हाला या ब्लॉगमध्ये सर्व अपडेट सहज मिळतील. करा क्लिक आणि वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 20, 2025 | 06:56 PM
Top Marathi News Today Live : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात

Top Marathi News Today Live : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : नितीश कुमार आज १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पाटण्यातील गांधी मैदानावर सकाळी ११:३० वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी राजभवनात गेले आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आणि नवीन सरकार स्थापनेचा दावा केला. राजकीय गोंधळाच्या दरम्यान, बुधवारी जेडीयू आणि भाजप विधिमंडळ पक्षांची बैठक झाली. नितीश कुमार यांना जेडीयू विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले. दरम्यान, भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सम्राट चौधरी आणि उपनेते म्हणून विजय कुमार सिन्हा यांच्या नावांना मान्यता देण्यात आली.

 

The liveblog has ended.
  • 20 Nov 2025 06:55 PM (IST)

    20 Nov 2025 06:55 PM (IST)

    Crime News: अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुध्द ‘ही’ कडक कारवाई; 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

    पंढरपूर: अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासनाच्या पथकास  मौजे गुरसाळे व मौजे शेळवे  ता.पंढरपूर येथील भिमा नदी पात्रात जे.सी.बी. साहयाने अवैधरीत्या वाळू उपसा करुन वाहतुक करताना  निदर्शनास आले असता सदर ठिकाणच्या  विविध वाहनांवर कारवाई करुन 50 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला  आहे.

  • 20 Nov 2025 06:32 PM (IST)

    20 Nov 2025 06:32 PM (IST)

    Mumbai Cruise Hub: मुंबईत जागतिक दर्जाची पर्यटन क्रांती! ५ भव्य क्रूझ टर्मिनलमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनाला मोठी चालना

    विजयसिंह जाधव । नवराष्ट्र मुंबई: देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबई येथे सुरू झाला आहे. या टर्मिनलवर एकाचवेळी ५ क्रूझ पार्क होण्याची क्षमता आहे. या आंतरराष्ट्रीय कूक्ष टर्मिनलमधून मुंबईतून गोवा, कोची, लक्षद्वीप, श्रीलंका, मालदीव, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा ठिकाणी क्रूझेसने पर्यटनाला जाता येईल, या क्रूझमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनाच्या सुविधा देण्यात आल्या असून, या क्रूझ टर्मिनलचे पहिले दोन मजले २ लाख ७ हजार स्क्वेअर फूट असणार आहेत. त्यामुळे पर्यटकांना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या सेवेमुळे देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकेल.

  • 20 Nov 2025 06:06 PM (IST)

    20 Nov 2025 06:06 PM (IST)

    पुणेकरांनो स्वेटर काढू नका! शहरात थंडीचा कडाका कायम; काय सांगतो Weather Report?

    पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लहर कायम असून सकाळ-संध्याकाळ गारठा जाणवत आहे. तापमानात किरकोळ चढ-उतार दिसत असले तरी हिवाळ्याची चाहूल  कायम आहे. गुरुवारी (दि. २०) पुण्यातील किमान तापमान ११ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी ( दि. २१) किमान तापमान १२ अंश सेल्सिअस आणि कमाल ३१ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.गेल्या काही दिवसांपासून सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत गारवा जाणवत आहे. नागरिक विशेषत: उबदार कपडे, स्वेटर आणि शॉलचा वापर करताना दिसत आहेत. तरीही दिवसाच्या वेळेत उन्हाचा चांगला उगम असल्याने तापमानात थोडीशी वाढ जाणवते.हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात सौम्य वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठवणाऱ्या थंडीपासून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र थंडीचा प्रभाव कायम असणार आहे.

  • 20 Nov 2025 05:57 PM (IST)

    20 Nov 2025 05:57 PM (IST)

    गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर?

    काय झाडी काय डोंगर अशा डायलॉगने गुवाहटीची वारी गाजवणारे शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील हे जोरदार चर्चेत आले. शहाजी बापू हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहतात. मात्र यावेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या आजाराबाबत वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून चिंता देखील व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत देखील मागितली आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 20 Nov 2025 05:38 PM (IST)

    20 Nov 2025 05:38 PM (IST)

    The Family Man 3 सह 7 जबरदस्त सिरीज-चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ

    जर तुम्ही तुमचा वीकेंड घरीच एन्जॉय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी नवीनतम चित्रपट आणि वेब सिरीजची यादी तयार आहे. यापैकी बहुतांश मालिका आणि चित्रपट उद्या, 21 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. तुम्ही कुटुंबासोबत एकत्र बसून या मनोरंजक सिरीजचा आनंद घेऊ शकता.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 20 Nov 2025 05:09 PM (IST)

    20 Nov 2025 05:09 PM (IST)

    नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका!

    भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये (Nepal) पुन्हा एकदा हिंसाचाराची आग उसळली आहे. यामुळे देशभारात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नेपाळचे पदच्युत पंतप्रधान के. पी. ओली शर्मा यांचा पक्ष CPN-UML आणि Gen Z मध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामुळे सध्याच्या अंतरिम सरकारने कर्फ्यू लागू केला आहे.

  • 20 Nov 2025 04:55 PM (IST)

    20 Nov 2025 04:55 PM (IST)

    ऐतिहासिक कामगिरी करत फुटबॉल वर्ल्डकपसाठी कुराकाओ पात्र

    कुराकाओच्या सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, गेल्या जानेवारीमध्ये देशाची लोकसंख्या १५६,११५ होती. यापूर्वी, आइसलँड हा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश होता. रशियामध्ये २०१८ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरला तेव्हा त्याची लोकसंख्या अंदाजे ३५०,०००होती.कुराकाओने कॉन्काकॅफ पात्रता स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि १२ गुणांसह गट ब मध्ये अव्वल स्थान पटकावले. डच प्रशिक्षक डिक अॅडव्होकाट यांच्या अनुपस्थितीतही कुराकाओने हा ऐतिहासिक निकाल मिळवला. ७८ वर्षीय अॅडव्होकाट यांना गेल्या आठवड्यात कौटुंबिक कारणांमुळे नेदरलँडला परतावे लागले. अॅडव्होकाट हे तीन वेळा डच राष्ट्रीय संघाचे कर्णधार होते आणि कुराकाओ येथे पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी दक्षिण कोरिया, बेल्जियम आणि रशियाचे प्रशिक्षक म्हणून काम केले.

  • 20 Nov 2025 04:45 PM (IST)

    20 Nov 2025 04:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर ते पुणे आता हवाई मार्गाने जोडले जाणार; ‘फ्लाय९१’ एअर सेवेची तयारी

    छत्रपती संभाजीनगर टुरिझम डेव्हलपर्स फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमेटीच्यावतीने शहरासाठी आवश्यक पुणे विमानसेवा सुरू करण्याची केंद्रीय नागरी उड्डूयण मंत्रालयाकडे वारंवार मागणी केली आहे. कमेटीचे चेअरमन सुनील कोठारी यांनी लोहगाव येथील एअर कमोडोरकडे पाठपुरावा केल्यानंतर “पलाय ९१० विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. या कंपनीची एटीआर 71-600 विमान याद्वारे चिकलठाणा येथे दोनवेळा दाखल होईल.

  • 20 Nov 2025 04:35 PM (IST)

    20 Nov 2025 04:35 PM (IST)

    नोकरीच्या नावाखाली माानवी तस्करीचं जाळं उघड; म्यानमारमधून १२५ भारतीयांची सुटका

    थालंडमधील (Thailand) भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या नऊ महिन्यात नोकरीच्या घोटाळ्याच्या प्रकरणाअंतर्गत १,५०० भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. रिक्रूटर एजंट्सच्या नोकरी भरतीच्या अमिषाला हे लोक बळी पडले होते. पण सध्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे मानवी तस्करीचं मोठं जाळं देखील उघड पडलं आहे. थायलंडमधील भारतीय दूतावासाने या नागरिकांना बॅंकॉकमार्गे माय सोट येथून मायदेशी पाठवले. सोशल मीडियावर एक्सवरुन याची माहिती देण्यात आली आहे.

  • 20 Nov 2025 04:35 PM (IST)

    20 Nov 2025 04:35 PM (IST)

    HSRP नोंदणीची प्रक्रिया संथगतीने सुरू; जिल्ह्यात केवळ ४० टक्के वाहनांना नंबर प्लेट

    महाराष्ट्र राज्यात वाहनांसाठी अनिवार्य झालेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (एचएसआरपी) ची नोंदणी प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात मंद गतीने सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत वाहनांपैकी अद्याप केवळ ३५-४० टक्के वाहनांनाच ही प्लेट्स बसवली गेली असल्याचे आढळून आले आहे. सध्या सुमारे १.२५ लाख वाहनांची एचएसआरपी नोंदणी झाली असून, जिल्हयात केवळ ६१ हजार ४१० वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट्स  बसविण्यात आल्या आहेत.

  • 20 Nov 2025 04:30 PM (IST)

    20 Nov 2025 04:30 PM (IST)

    महायुतीतील दोन पक्ष निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता

    लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेले महायुतीतील दोन पक्ष या निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता असून, याठिकाणी तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.औसा नगरपरिषद निवडणुकीत भाजप - शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडी असा तिरंगी सामना होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे. दरम्यान, येत्या 21 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप- शिवसेना युतीकडून भाजपच्या डॉ. ज्योती बनसुडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून परवीन नवाबोद्दीन शेख आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या मंजुषा माडजे या निवडणुकीच्या मैदानात आहेत.

  • 20 Nov 2025 04:25 PM (IST)

    20 Nov 2025 04:25 PM (IST)

    मुक्ताईनगरच्या होम ग्राउंडवर Eknath Khadse नी चक्क घेतली माघार काय आहेत कारणं

    मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीतून एकनाथ खडसे यांनी माघार घेतली आहे. शरद पवार राष्ट्रवादीचा उमेदवार उभे न करण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने मुक्ताईनगर नगरपंचायतीची जबाबदारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यावर सोपवली आहे. रक्षा खडसे यांच्यावर जबाबदारी सोपवल्यानेच एकनाथ खडसे यांनी निवडणुकीतून माघार घेतली अशी चर्चा सध्या आहे. खडसेंनी निवडणुकीतून माघार घेत भाजपला एक प्रकारे बाय दिला आहे. एकनाथ खडसे यांच्या सुन रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांची केंद्रातील ताकद वाढली होती. मात्र आता ही ताकद त्यांच्यासाठी अडचण बनली आहे. रक्षा खडसे यांना ही निवडणूक सोपी जावी यासाठीच खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.

  • 20 Nov 2025 04:20 PM (IST)

    20 Nov 2025 04:20 PM (IST)

    युती नाकारल्याने सुनील शेळकेंची भाजपला कडवं आव्हान देण्याची तयारी .

    लोणावळ्यात भाजप कोर कमिटीने राष्ट्रवादीचा युती प्रस्ताव नाकारत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. यानंतर भाजपने मोठं शक्तिप्रदर्शन करत प्रचाराला दमदार सुरुवात केलीये. यंदाच्या लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित झाली असून, मागच्या निवडणुकीत सत्ता मिळवलेल्या भाजपसमोर यंदा ती सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. राष्ट्रवादी आमदार सुनील शेळके यांनी भाजपला कडवं आव्हान देण्याची तयारी केली असून, या लढाईत भाजप माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या राजकीय चुरशीच्या सामनाात भाजप आपला गड राखते का? हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 Nov 2025 04:15 PM (IST)

    20 Nov 2025 04:15 PM (IST)

    'म्हाडाच्या कामात राजकीय दबाव आहे का?’ वरळी बीडीडी चाळ रहिवाशांचा म्हाडाच्या विरोधात निषेध ...

    “मुंबईतल्या वर्लीतील बीडीडी चाळ पुनर्विकासावरून स्थानिक रहिवाशांचा रोष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. महाडाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रहिवाशी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत.”

  • 20 Nov 2025 04:10 PM (IST)

    20 Nov 2025 04:10 PM (IST)

    प्रत्येक वार्डात घोरपडे पॅटर्न राबवून बदलापूरचे नंदनवन करणार -राजेंद्र घोरपडे

    बदलापूरच्या विकासात भाजपचे मोठे योगदान असून आम्ही केलेल्या विकासकामांमुळे बदलापूरची जनता भाजपचाच नगराध्यक्ष करेल असा विश्वास माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.

  • 20 Nov 2025 04:03 PM (IST)

    20 Nov 2025 04:03 PM (IST)

    जामखेडमध्ये भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! 'चिंतामणी'च्या नावाने विरोधकांची 'चिंता' वाढवली!

    महाराष्ट्रातील नगरपरिषदेच्या निवडणुकीचा हा रणसंग्राम सध्या जामखेडमध्ये कमालीचा तापला आहे. स्थानिक पातळीवरील दोन महाशक्तींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असतानाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दमदार एन्ट्री केल्याने ही लढत आता थेट तिरंगी झाली आहे...सध्या निवडणुकीची मुख्य चुरस भाजप आणि शिंदेंच्या उमेदवारांमध्ये पहायला मिळते आहे...भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी प्रांजल चिंतामणी मैदानात उतरले आहेत...त्यांचे सर्वश्रुत सामाजिक कार्य आणि विशेषतः विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदेंचा शहरावरील अखंड प्रभाव, या दुहेरी जोरावर भाजपचे पारडे सध्या जड मानले जात आहे. त्यामुळे, या निवडणुकीत जामखेडच्या राजकारणावर कोणत्या 'शिंदें'चा म्हणजेच, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाचा की भाजपचे नेते प्रा. राम शिंदेंच्या प्रभावाचा झंझावात अधिक असेल, याकडे संपूर्ण जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

  • 20 Nov 2025 03:40 PM (IST)

    20 Nov 2025 03:40 PM (IST)

    डिसेंबरमध्ये मंगळ करणार संक्रमण, 45 दिवस या राशीच्या लोकांच्या समस्येमध्ये होणार वाढ

    ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. तो वृश्चिक राशीतून प्रवास संपवून संध्याकाळी 7.26 वाजता धनु राशीत प्रवेश करेल. मंगळ दर 45 दिवसांनी राशी बदलत असल्याने, हे संक्रमण खूप काळानंतर होत आहे. त्याचे परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला शौर्य, ऊर्जा आणि युद्धाचा कारक मानले जाते. त्याचे हे संक्रमण नेहमी प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करते. काही राशींच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर मानला जातो. तर काहींना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर, नोकरी आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अडचणी येतात. मंगळाच्या धनु राशीत प्रवेशामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्या जाणवू शकतात ते जाणून घ्या.

    वाचा सविस्तर 

  • 20 Nov 2025 03:28 PM (IST)

    20 Nov 2025 03:28 PM (IST)

    दुबईमध्ये खास AI मशीनने काही सेकंदात हेअर कट?

    सध्या जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून यामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.  एआय द्वारे अनेक तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. पण याच एआयवरुन डिपफेकच्या मदतीने अनेक वेगवेगळे व्हिडिओ देखील बनवले जात आहे. ज्यातून एक अभासी जग तयार केले जात आहे. जे पाहून लोक थक्क होतील.

    वाचा सविस्तर

  • 20 Nov 2025 03:20 PM (IST)

    20 Nov 2025 03:20 PM (IST)

    हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित प्या गरमागरम सूप

    वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडगार वातावरणात जास्त वेळ बाहेर फिरल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. हाड दुखणे, हातपाय दुखणे, कंबर दुखणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, सर्दी, खोकला, साथीचे आजार इत्यादी आजारांमुळे शरीर कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात कोणत्याही विकतच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला टोमॅटो, मिक्स भाज्या आणि लसुणचा वापर करून गरमागरम सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सूप प्यायल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. थंडीतील आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित सूप आणि शरीरात उष्णता टिकून राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मिक्स भाज्यांचे पौष्टिक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.

    वाचा सविस्तर

  • 20 Nov 2025 03:07 PM (IST)

    20 Nov 2025 03:07 PM (IST)

    मुळापासून कसे उपटून काढाल Diabetes? बाबा रामदेवांनी दिला रामबाण उपाय

    मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीराला आतून कमकुवत करतो. जर वेळीच नियंत्रणात आणले नाही तर ते तुमच्या नसा, डोळे आणि किडनींना नुकसान पोहोचवू शकते. गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. केवळ वृद्धच नाही तर तरुणही मधुमेहाचे बळी ठरत आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतेक लोक मधुमेह नियंत्रित करण्यासाठी औषधांवर अवलंबून असतात. तथापि, स्वामी रामदेव यांनी मधुमेह निर्मूलनाचे काही मार्ग सांगितले आहेत. डायबिटीस हा सध्या जगभरात वेगाने वाढणारा आजार आहे. याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या जीवाची हेळसांड करत आहात हे विसरू नका. त्यामुळे डायबिटीस असेल तर त्याचा मुळापासून कसा नायनाट करायचा यासाठी हा लेख नक्की वाचा.

    वाचा सविस्तर 
  • 20 Nov 2025 02:55 PM (IST)

    20 Nov 2025 02:55 PM (IST)

    Raid 3: अजय देवगण पुन्हा रेड मारण्यास सज्ज, चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच होणार सुरु

    रेड आणि रेड २ च्या प्रचंड यशानंतर, अजय देवगण आता "रेड ३" चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्याचा या चित्रपटाचा तिसरा भाग आता लवकरच येणाऱ्या नवीन वर्षात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजयने पुन्हा एकदा दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्यासोबत काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून निर्माते रेड ३ च्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. चाहत्यांनी अजय देवगणच्या या क्राइम थ्रिलर फ्रँचायझीवर खूप प्रेम केले आणि त्याला भरभरून प्रतिसाद देखील दिला. म्हणूनच निर्माते आता त्याच्या तिसऱ्या भागाचा विचार करत आहेत.

  • 20 Nov 2025 02:51 PM (IST)

    20 Nov 2025 02:51 PM (IST)

    घरीच आता बनवा ‘थिएटर’, आवाज वाढताच वाटेल Disco Club

    कोडॅक टीव्हीने भारतात त्यांची नवीन मोशनएक्स क्यूएलईडी सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये 55-, 65- आणि 75-इंच स्मार्ट टीव्ही मॉडेल्स आहेत. कंपनीने विशेषतः 4K कंटेंट, स्पोर्ट्स आणि गेमिंगसाठी उच्च-कार्यक्षमता टीव्ही शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही सिरीज डिझाइन केली आहे. हे टीव्ही त्यांच्या किंमत विभागात प्रीमियम पिक्चर क्वालिटी, जलद रिफ्रेश रेट आणि उत्कृष्ट ऑडिओ परफॉर्मन्स देण्याचा दावा करतात.

  • 20 Nov 2025 02:45 PM (IST)

    20 Nov 2025 02:45 PM (IST)

    कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या १ ऑक्टोबरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महापालिकेअंतर्गत तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाचा पहिला वार्षिक स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार पडला. आपल्या शाळेतून शिक्षणाची शिदोरी घेऊन पुढील आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची पावले पुन्हा एकदा शाळेकडे वळण्याची ही एक संस्कारपूर्ण आणि सांस्कृतिक परंपरा असल्याचे या मेळाव्याद्वारे स्पष्ट झाले.

  • 20 Nov 2025 02:37 PM (IST)

    20 Nov 2025 02:37 PM (IST)

    CSK च्या जर्सीत पहिल्यांदाच दिसला संजू सॅमसन! दिले मोठे विधान

    आयपीएलमध्ये संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा पर्याय बनला होता. आता, २०२६ च्या मिनी लिलावापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्जसोबत एका ब्लॉकबस्टर ट्रेड डीलमध्ये सामील झाला आहे. फ्रँचायझीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर सॅमसनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आयपीएल स्टार पहिल्यांदाच पिवळी जर्सी घालताना दिसत आहे. त्याचा जर्सी नंबर ११ आहे. व्हिडिओमध्ये, सॅमसन पहिल्यांदाच पिवळी जर्सी घातल्यानंतर त्याच्या भावनांबद्दल बोलतो आणि स्वतःला भाग्यवान म्हणतो. तो म्हणतो की त्याला चॅम्पियनसारखे वाटते.

  • 20 Nov 2025 02:30 PM (IST)

    20 Nov 2025 02:30 PM (IST)

    बिबट्याच्या हल्ल्याचा परिणाम शाळांच्या वेळांवर!

    सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये बिबट्याने हाहाकार केला आहे. तेथील नागरिक जीव मुठीत धरून दिवस घालवत आहेत. पण याचा मोठा परिणाम स्थानिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे, कारण बिबट्याच्या भीतीमुळे स्थानिक पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे टाळत आहेत. कारण शाळकरी विद्यार्थ्यांवर बिबट्याचा हल्ला होण्याचा प्रमाणही वाढीस आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षणाची तारांबळ उडतानाचे चित्र दिसून येत आहे. तरी स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन स्थानिक शाळांच्या वेळांमध्ये बदल केला आहे.

  • 20 Nov 2025 02:23 PM (IST)

    20 Nov 2025 02:23 PM (IST)

    कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

    कधी कोयता गँगची भररस्त्यात दहशत तर कधी कोयतेधारी लुटमार करणाऱ्यांचा धिंगाना सुरू असतानाच पुण्याचा मध्यभाग आणि रात्रीही रहदारी असलेल्या डेक्कनसारख्या परिसरातील हॉटेलचे शटर डाऊन केल्यानंतर देखील लुटमार करणाऱ्या चौघांनी शटर उघडून आत प्रवेश करत कोयत्याच्या धाकाने हॉटेलमध्ये लुटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात हॉटेल व्यवसायिक लक्ष्मीकांत गुंजकर (वय ४५, रा. आंबेगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Nov 2025 02:20 PM (IST)

    20 Nov 2025 02:20 PM (IST)

    '120 Bahadur' मधील सर्व १२० सैनिकांचा होणार सन्मान, निर्मात्यांनी दिले दिल्ली उच्च न्यायालयाला आश्वासन

    "१२० बहादूर" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात, मेजर शैतान सिंग भाटीची भूमिका करणारा फरहान अख्तर एका सैनिकाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. ज्यांना रेझांग लाच्या गोठवणाऱ्या वाऱ्यात जवळजवळ गाडले गेले होते. हा चित्रपट केवळ देशभक्तीचा उत्साह निर्माण करणार नाही तर एका मूक, भयानक आणि हृदयद्रावक बलिदानाचा साक्षीदार देखील होईल. दिग्दर्शक रजनीश घई यांनी देशभक्तीवर आधारित शौर्याची ही गाथा प्रेक्षकांसमोर सादर केली आहे.

  • 20 Nov 2025 02:15 PM (IST)

    20 Nov 2025 02:15 PM (IST)

    बापानेच केला मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्याचार

    केरळमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. केरळमधील वडिलांनीच आपल्या ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. माहेरी येथील एका पोक्सो न्यायालयाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ४० वर्षीय बापाला 178 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या संबंधी न्यायाधीश एएम अशरफ यांनी आरोपीला 11 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असल्याची माहिती आहे.

  • 20 Nov 2025 02:08 PM (IST)

    20 Nov 2025 02:08 PM (IST)

    Vaibhav Suryavanshi ने नवा रेकाॅर्ड केला नावावर!

    भारत अ संघाने एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ मध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत भारत अ संघाचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी हा उत्कृष्ट कामगिरी करत आहे. त्याने यूएईविरुद्धच्या धमाकेदार शतकाने सर्वांना आश्चर्यचकित केले. यासह, वैभवने एक मोठा विक्रम रचला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेतील इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.

  • 20 Nov 2025 01:56 PM (IST)

    20 Nov 2025 01:56 PM (IST)

    मैत्री पुन्हा ट्रॅकवर…! Trump च्या ‘या’ व्यक्तव्यानंतर Musk ने मानले आभार

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांच्यातील तणाव पुन्हा निवळताना दिसत आहे. सध्या दोघे १९ नोव्हेंबर रोजी सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सन्मानार्थ झालेल्या डिनरमध्ये एकत्र दिसून आले. यानंतर अमेरिकेच्या राजकारणात आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठा खळबळ उडली आहे.

  • 20 Nov 2025 01:40 PM (IST)

    20 Nov 2025 01:40 PM (IST)

    कुणाल कामराच्या रडारवर भारतीय रेल्वे

    भारतामध्ये सर्वात मोठे सरकारी क्षेत्र म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिले जाते. अंतर्गत भारतातील प्रवास हा रेल्वेने जोडला गेला आहे. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती हा प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय निवडतो. मुंबई सारख्या शहरामध्ये तर लोकल ही चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लाखो लोक दररोज रेल्वे प्रवास करत असताना सरकारकडून याच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप कॉमेडियन कुणाल कामरा याने केला आहे.

  • 20 Nov 2025 01:35 PM (IST)

    20 Nov 2025 01:35 PM (IST)

    सोनम कपूरने Pregnancy ची केली स्टायलिश घोषणा

    बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आता लवकरच तिच्या आयुष्यात दुसऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा करत एका स्टायलिश लूकमध्ये स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तसेच अभिनेत्रीने तिचा क्युट बेबी बंप देखील दाखवला आहे.

  • 20 Nov 2025 01:25 PM (IST)

    20 Nov 2025 01:25 PM (IST)

    बांग्लादेशी खेळाडूने 100 व्या कसोटी सामन्यात रचला इतिहास!

    बांगलादेश क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज मुशफिकुर रहीमने आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील १३ वे शतक आहे, पण खूप खास आहे. हे शतक त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यात आले असल्याने ते संस्मरणीय बनले. यासह, मुशफिकुर त्याच्या १०० व्या कसोटीत शतक झळकावणारा जगातील ११ वा खेळाडू बनला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अद्याप कोणत्याही भारतीयाने या यादीत आपले नाव जोडलेले नाही.

  • 20 Nov 2025 01:16 PM (IST)

    20 Nov 2025 01:16 PM (IST)

    भाजपमध्ये बंड! ’13 सच्चे कार्यकर्ते’ निवडणुकीच्या रिंगणात; राजकारणात भूकंप

    रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपाने केलेले तिकीट वाटप आणि त्यातून उद्भवलेली अंतर्गत नाराजी आता राजकीय भूकंपात रूपांतरित झाली आहे. पक्षाचे निष्ठावान आणि जमिनीवर कार्य करणारे ‘सच्चे १३ कार्यकर्ते’ यांनी नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे आणि स्थानिक गटबाजीला कंटाळून थेट अपक्ष उमेदवार म्हणून रत्नागिरी नगपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे.

  • 20 Nov 2025 01:15 PM (IST)

    20 Nov 2025 01:15 PM (IST)

    “मैं सत्यनिष्ठा से… बिहार मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमारांनी घेतली शपथ

    संपूर्ण देशामध्ये चर्चेत असलेली बिहार विधानसभा निवडणूक (Bihar ELections) पार पडली. यामध्ये एनडीएला घवघवीत यश मिळाले. नितीश कुमार(Nitish Kumar) आणि भाजपची जादू बिहारमध्ये देखील चालली आणि बिहारी जनतेने एनडीए आघाडीला पाठिंबा दर्शवला. भाजप प्रणित आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून 243 जागांपैकी 202 जागांवर विजय मिळाला आहे. यानंतर आता नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला असून नितीन कुमार यांच्यासह 26 जणांनी गोपनीयतेची शपथ घेतली.

  • 20 Nov 2025 01:05 PM (IST)

    20 Nov 2025 01:05 PM (IST)

    फिलीपिन्सनंतर जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश विकत घेणार ‘BrahMos’

    फिलीपिन्सनंतर (Philippines) आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम देश इंडोनेशिया (Indonesia) भारताकडून सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’(BrahMos) खरेदी करण्याच्या मार्गावर आहे. या मोठ्या कराराचे वजन फक्त आर्थिक नाही, तर त्यामागे आशिया-पॅसिफिकच्या बदलत्या भू-राजकारणाचे स्पष्ट संकेत दडलेले आहेत. इंडोनेशियाचा हा निर्णय दक्षिण चीन समुद्रातील वाढती तणावपूर्ण परिस्थिती, चिनी नौदलाची घुसखोरी आणि वाढती सामरिक आव्हाने यांच्याशी थेट जोडलेला आहे.

  • 20 Nov 2025 12:55 PM (IST)

    20 Nov 2025 12:55 PM (IST)

    कांदिवलीत दिवसाढवळ्या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

    मुंबईतून गोळीबाराची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. आरोपींनी फ्रेंडी दिलीमा भाईवर विकासकावर 2 ते 3 राऊंड फायर केले. यात विकासक गंभीर जखमी झाला आहे.

  • 20 Nov 2025 12:45 PM (IST)

    20 Nov 2025 12:45 PM (IST)

    सुसाईड नोटमध्ये शिक्षकांच्या छळाचा थरकाप उडवणारा आरोप

    दिल्लीतील दहावीतील विद्यार्थी शौर्य पाटीलने शिक्षकांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करून मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी प्राचार्या आणि चार शिक्षिकांवर गुन्हा दाखल केला.

  • 20 Nov 2025 12:35 PM (IST)

    20 Nov 2025 12:35 PM (IST)

    १७ वर्षीय अल्पयीनीची हत्या करून बागेत पुरला मृतदेह

    प्रयागराजमध्ये 17 वर्षीय साक्षी यादवची तिच्याच प्रियकर हर्षवर्धन सिंहने हत्या करून बागेत पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बॅग, सिंदूर आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांनी तपास वेगाने उकलत आरोपीला अटक केली.

  • 20 Nov 2025 12:25 PM (IST)

    20 Nov 2025 12:25 PM (IST)

    एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला

    पुण्यात एरंडवणे परिसरातील अनंत रेस्टोबारवर मध्यरात्री ४–५ जणांच्या टोळक्याने कोयते व दांडक्यांसह हल्ला केला. ग्राहकांना धमकावून फोडतोड व रोख रक्कम लंपास करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद.

  • 20 Nov 2025 12:15 PM (IST)

    20 Nov 2025 12:15 PM (IST)

    व्हॉट्सअॅपवर आलेल्या फाईलचा महागडा धडा; शिक्षकांच्या खात्यातून ७.५६ लाखांचा फटका

    रत्नागिरीतून सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. सेवानिवृत्त शिक्षकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘बँक ऑफ इंडिया' च्या नावाची फाईल आली. ही फाईल उघडताच बँक खात्यातून रक्कम गायब झाली. शिक्षकांच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची मोठी रक्कम गायब केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहे.

  • 20 Nov 2025 12:05 PM (IST)

    20 Nov 2025 12:05 PM (IST)

    अंजली दमानियांचा अजित पवारांना जहरी सवाल

    अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. याबाबत सोशल मीडिया पोस्ट करत दमानिया यांनी लिहिले आहे की, "अजित पवार कुठल्या खत्री काँट्रॅक्टर बद्दल बोलत आहेत ? निसार खत्री ? सिंचन घोटाळ्यातले ? म्हणूनच त्यांच्या घशात पुन्हा ₹300 कोटी घालण्याचा प्रयत्न होतोय? ऑगस्ट महिन्यात हाय कोर्ट पासून खरी माहिती लपवण्यात आली, कोर्टची दिशाभूल करून ह्याच काँट्रॅक्टर ‘खत्री’ ने ₹३०० कोटी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. दुःख या गोष्टीची वाटते की सरकारने या ऑर्डर ला सुप्रीम कोर्टात चैलेंज करायला हवे होते." असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

  • 20 Nov 2025 11:55 AM (IST)

    20 Nov 2025 11:55 AM (IST)

    जरांगे पाटील यांची पोलीस सुरक्षा काढून घ्यावी

    मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात मनोज जरांगे पाटील यांची पोलीस सुरक्षा काढण्याबाबत अर्ज दिला आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः आपली पोलीस सुरक्षा नको अशी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली होती. हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाचा तपास थंडावला असल्याचा जरांगे पाटील यांना संशय आहे. त्यामुळे त्यांनी शासनावर टीका करत पोलीस सुरक्षेची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

  • 20 Nov 2025 11:45 AM (IST)

    20 Nov 2025 11:45 AM (IST)

    एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा आहे; दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या दैदिप्यमान विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बिहारमधील एनडीएची एकजूट विजयाचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील महायुतीत मतभेद असल्याच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या. “मी तक्रारीचा पाढा वाचणारा एकनाथ शिंदे नाही, रडणारा नाही लढणारा आहे,” असे ते म्हणाले.

  • 20 Nov 2025 11:30 AM (IST)

    20 Nov 2025 11:30 AM (IST)

    सांगलीतील दहावीच्या मुलाने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरुन सुसाईड

    सांगली जिल्ह्यातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीत मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शौर्य प्रदीप पाटील (वय वर्षे १६) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत शिकत होतो. सेंट कोलंबस शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 20 Nov 2025 11:15 AM (IST)

    20 Nov 2025 11:15 AM (IST)

    महाराष्ट्राचे मुळ मुख्यमंत्री अमित शाह - कॉंग्रेस

    कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेत्यांवर आणि महायुतीवर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री अमित शाह आहेत. महाराष्ट्राचा सर्व कारभार अमित शाह चालवत आहेत. ते सांगतील त्यांनाच मंत्री केले जाते. ते सांगतील त्या प्रमाणेच खातेवाटप केले जाते.

  • 20 Nov 2025 11:07 AM (IST)

    20 Nov 2025 11:07 AM (IST)

    म्हैसूरचा राजा टीपू सुलतानची जयंती

    टिपू सुलतान हा म्हैसूरचा शासक होता. त्याने मराठ्यांशी संघर्ष केला आणि राज्य बळकावले. टिपू सुलतान आणि मराठे हे ब्रिटिशांविरुद्धच्या त्यांच्या लढाईत शत्रू होते, पण त्याने मराठ्यांशीही अनेक युद्धे केली. टिपू सुलतानकडे फारसी, मराठी, उर्दू आणि कन्नड या भाषांची चांगली जाण होती. टीपू सुलतानची मराठी पत्रे आजही उपलब्ध आहेत. त्याने लिहिलेली पत्रे आजही उपलब्ध आहेत, जी त्याच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याची माहिती देतात.

  • 20 Nov 2025 10:59 AM (IST)

    20 Nov 2025 10:59 AM (IST)

    Trump-Mamdani च्या भेटीची तारिखी ठरली निश्चित

    एक मोठी बातमी आहे, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोघांच्या भेटीचीही तारिख निश्चित झाली असून सध्या ही भेट जगभरात राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.

  • 20 Nov 2025 10:49 AM (IST)

    20 Nov 2025 10:49 AM (IST)

    10 व्या वेळी घेणार नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ

    बिहारचे राजकारण आज एका नवीन अध्यायात प्रवेश करत आहे. गांधी मैदान हे त्या क्षणाचे साक्षीदार होणार आहे जेव्हा नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. गुरुवारी सकाळी ११:३० वाजता होणारा हा कार्यक्रम केवळ सत्तांतराचा क्षण मानला जात नाही तर एनडीएच्या भविष्यातील दिशा दर्शविणारा एक मोठा राजकीय शक्तीप्रदर्शन देखील मानला जातो. हे शहर सकाळपासूनच गजबजले आहे. गांधी मैदानाबाहेर बॅरिकेड्स, तैनात सुरक्षा कर्मचारी आणि आयोजकांच्या गर्दीमुळे संपूर्ण शहर एका भव्य उत्सवाच्या गर्दीने निनादत आहे. 

  • 20 Nov 2025 10:40 AM (IST)

    20 Nov 2025 10:40 AM (IST)

    माजी PoK पंतप्रधानांच्या VIDEOने उघडल्या पाकिस्तानच्या कटकारस्थानाच्या खिडक्या

    दिल्लीतील(Delhi Blast) १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार स्फोटाने देश हादरला होता. या हल्ल्याच्या तपासात जसजसे धागेदोरे बाहेर येत होते, तसतसे हे प्रकरण अधिक गंभीर होत होते. पण आता या तपासाला एका धक्कादायक वळण देणारा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ आहे पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक( Chaudhary Anwarul Haq) यांचा ज्यात ते उघडपणे दावा करतात (video viral)  की दिल्लीतील स्फोटासह भारतातील अनेक हल्ल्यांमागे पाकिस्तानच आहे.

Web Title: Marathi breaking live updates top national international crime news 22 november 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi Batmya
  • navarashtra breaking news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.