सूरतमध्ये पॉश बिल्डिंगला भीषण आग (प्रातिनिधिक फोटो- सोशल मिडिया)
सूरत: गुजरातच्या सूरत शहरातील वेसू परिसरात असलेल्या अल्ट्रा लक्झरी अशा हॅप्पी एक्सेलेंशिया रहिवाशी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती, की क्षणार्धात अनेक मजले आगीच्या विळख्यात सापडले. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
सुरत फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसच्या टिम्स तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. शहरातील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत. या बिल्डिंगला लागलेली भीषण आग होती की अनेक किलोमीटर दूरवरुण आगीचे लोळ दिसून येत होते.
छत्रपती संभाजीनगरमधील ‘ग्रँड सरोवर’ हॉटेलला भीषण आग
छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ग्रँड सरोवर या हॉटेलला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर-धुळे हायवेवर तिसगाव येथील ग्रँड सरोवर हॉटेल आहे. या हॉटेलला भीषण आग लागली आहे. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते आहे.
अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे हॉटेलचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर येत आहे. आगीचे, धुराचे लोट दूरवर पसरल्याचे पाहायला मिळत होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ही आग कशामुळे लागली हे अद्याप संजू शकलेले नाही. हॉटेलक्या किचनमधून ही आग लागली असल्याचे म्हटले जात आहे.
Fire News: मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील ‘ग्रँड सरोवर’ हॉटेलला भीषण आग
देहू-आळंदी रोडवरील स्क्रॅप गोदामाला आग
पिंपरी-चिंचवड परिसरातील देहू-आळंदी रोडवर असलेल्या एका स्क्रॅप गोदामात मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे आग जास्त प्रमाणात वाढत गेली असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
देहू-आळंदी रोडवरील स्क्रॅप गोदामाला ही आग लागली. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये विविध स्क्रॅप साहित्य, प्लास्टिक आणि लोखंडी वस्तू मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचेही आगीमुळे मोठे नुकसान झाले. गोदामाला लागलेली ही आग तब्बल तीन ते चार तासांनी आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, आगीचे कारण अस्पष्ट आहे.