लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांनी सह्या केल्या आहे. एकंदरित नरेंद्र मोदीचं तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे. कालचा लोकसभा निवडणुकीचा निकाल फारच धक्कादायक होता. असे म्हंटले जात आहे की, महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री शिंदे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंच्या सह्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान पदाचा मार्ग आता मोकळा झाला असून बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – President of India X अकाउंट)
[read_also content=”नितीश कुमार, नायडूंनी मोदी सरकारला साथ दिली नाही तर काय होईल? NDA सरकार होईल का स्थापन? संपूर्ण समीकरण इथे समजून घ्या! https://www.navarashtra.com/india/nitish-kumar-and-chandrababu-naidu-other-nda-leaders-hold-meeting-pm-modi-543256.html”]
कालच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीप्रणीत एनडीएने 292 जागांवर विजय मिळवला. तर यामध्ये फक्त भाजपने एकूण २४० जागांवर विजय मिळवला. कालच्या निकालामध्ये एनडीए आणि इंडिया यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
एनडीएचे प्रतिस्पर्धी काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने 234 जागांवर ताबा मिळवला आहे तर केंद्रात सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 272 आहे. त्यामुळे एनडीएकडून सत्ता स्थापन केली जाऊ शकते. तर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होऊ का? अशी चर्चा सुरू होत्या. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. देशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.
नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा शपथ घेणार
येत्या 8 जून रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रपती भवन येथे मोदी सरकारचा तिसऱ्या टर्मसाठी 8 जून रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे . त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन येथे तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, आज दिल्लीत कॅबिनेट मीटिंग देखील झाली. तर दुसरीकडे आज पासून 8 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच हे राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे. आज राष्ट्रपतींनी १७ वी लोकसभा विसर्जित केली आहे.त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.