फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. 15 मार्च 2025 पासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक नागरिक 31 जुलै 2025 पर्यंत आपले नामांकन पाठवू शकतात. हे नामांकन आणि शिफारसी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील. पद्म पुरस्कारांमध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री या सन्मानांचा समावेश होतो. हे पुरस्कार 1954 मध्ये सुरू झाले असून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी यांची घोषणा केली जाते. हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, खेळ, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, लोककार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात.
कोणताही भारतीय नागरिक, त्याचा जात, व्यवसाय, पद किंवा लिंग विचारात न घेता. या पुरस्कारासाठी पात्र आहे. या पुरस्कारास पात्र होण्यासाठी काही निकष असतात, त्यांचा आढावा घेणे महत्वाचे आहे. , डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता अन्य सरकारी कर्मचारी, ज्यात सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारीही आहेत, ते पात्र नाहीत.
सरकार पद्म पुरस्कारांना ‘जनतेचे पद्म’ बनवण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांनी स्व-नामांकनासह अन्य पात्र व्यक्तींसाठीही शिफारसी कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः महिला, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग आणि दुर्बल घटकांतील प्रतिभावान व्यक्ती शोधून त्यांना नामांकनात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्याची सूचना देण्यात आली आहे.
पद्म पुरस्कारांसाठी नाव सुचवताना संबंधित व्यक्तीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय आणि असामान्य कामगिरीचे सविस्तर वर्णन (८०० शब्दांत) करणे आवश्यक आहे. सुचवण्यात आलेल्या उमेदवाराची कामगिरी, त्याने मिळवलेले यश आणि इतर काही महत्वाच्या बाबी जे त्या व्यक्तीस या पुरस्काराच्या पात्र बनवतात, त्या सांगणे आवश्यक आहेत. Nomination बाबत अधिक माहिती गृह मंत्रालयाच्या वेबसाइट (https://mha.gov.in) तसेच पद्म पुरस्कार पोर्टल (https://padmaawards.gov.in) वर ‘पुरस्कार आणि पदके’ या विभागात उपलब्ध आहे.