जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के (फोटो- istockphoto)
श्रीनगर: जम्मू- काश्मीरमध्ये दुपारच्या वेळेस भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १ वाजल्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, भूकंपाचे धक्के जाणवले असले तरी कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.
भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये होते. जमिनीपासून १० किलोमीटर खाली भूकंपाचे मुख्य केंद्र होते. भूकंपाचे केंद्र रावळपिंडी पासून ६० कीमी दूर होते. अचानक भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा बचाव केला.
म्यानमारनंतर आता ‘या’ देशातही जाणवले भूकंपाचे धक्के
ताजिकिस्तानमध्ये भूकंपाचे सौम्य, पण जाणवण्यासारखे धक्के नोंदवण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (NCS) च्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या 110 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाची नोंद 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजून 24 मिनिटे आणि 9 सेकंदांनी झाली. ताजिकिस्तानच्या राजधानीजवळ आणि इतर भागांमध्ये नागरिकांना अचानक जमिनीखालून धक्के जाणवले, त्यामुळे अनेक जण भीतीपोटी घराबाहेर पडले. परंतु, या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
अलिकडेच म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने संपूर्ण आशियाला हादरवून टाकले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ३,००० नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी व बेपत्ता झाले आहेत. भारतासह अनेक देशांनी तातडीने मदत आणि बचावकार्यासाठी म्यानमारमध्ये मदत पाठवली.
Earthquake in Tajikistan: म्यानमारनंतर आता ‘या’ देशातही जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के
पृथ्वीच्या आत खोलवर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या प्रचंड खडकांच्या पट्ट्या असतात. पृथ्वीवर एकूण १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत हालचालीत असतात – काही वेळा एकमेकींवर आदळतात, तर कधी एकमेकांपासून दूर जातात. या हालचालींमुळे जेव्हा संचित ऊर्जेचा विस्फोट होतो, तेव्हा भूकंप निर्माण होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जाते. ४.२ ही तीव्रता सौम्य श्रेणीत मोडते, आणि सामान्यतः अशा भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर हानी होत नाही. परंतु, जर भूकंप अधिक तीव्रतेचा असेल, तर भूस्खलन, इमारतींचे पडणे, जलमार्ग आणि वाहतुकीचे नुकसान होऊ शकते.