फोटो - सोशल मीडिया
मणिपूर : मणिपूरमध्ये मागील वर्षापासून तणावपूर्ण परिस्थिती होती. कुकी आणि मैतेय समजामधील वाद पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. एका वृद्धाच्या झालेल्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा परिस्थिती चिघळत आहे. मणिपूरमध्ये मागील एक वर्ष हिंसाचार आणि जाळपोळ होत होती. यामुळे मणिपूर जळत असल्याची खंत देशभरातून व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर शांतता करार करण्यात आला. आता मात्र पुन्हा एकदा हत्या होण्यास सुरुवात झाली आहे.
हिंसाचाराला पुन्हा होतीये सुरुवात
मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी (दि.06) कुकी सशस्र गटाकडून बिष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला चक्क रॉकेट हल्ला करण्यात आला. कुकी अतिरेक्यांनी मणिपूरचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मारेम्बम कोईरेंग यांच्या घरावर रॉकेट बॉम्बने हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होते. आणि 5 जण जखमी झाले होते. प्रत्यक्षदर्शी व्यक्तीनुसार, रॉकेट घराच्या भिंतीवर आदळले आणि लगेचच त्याचा मोठा स्फोट झाला होता. कुकी-झोमी बहुसंख्य चुराचंदपूर जिल्ह्यात उंच स्थानांवरून ट्रोंगलाओबीच्या सखल निवासी भागाकडे अशा प्रकारचे रॉकेट डागण्यात आले होते.
त्यानंतर आज पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कुकी सशस्र गटाने पहाटेच्या सुमारास निंगथेम खुनौ या भागामध्ये राहणाऱ्या मैतेई समाजाच्या एका 63 वर्षीय वृद्ध नागरिकाची घरात घुसून हत्या केली. तसेच त्यांनी त्या परिसरात अंदाधुंद गोळीबारही केला. त्यानंतर दुपारी मैतेई सशस्र गटाने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. यामुळे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. शालेय प्रशासनादेखील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय जाहीर केला आहे.