मणिपूरमध्ये मोठ्या राजकीय हालचाली, भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा
मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ४४ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी नऊ आमदारांसह राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. जनतेच्या इच्छेनुसार ४४ आमदार सरकार स्थापन करण्यास तयार आहेत, असं राधेश्याम सिंह यांनी म्हटलं आहे.
आम्ही राज्यपालांना सांगितले आहे. या समस्येवर काय उपाय असू शकतो यावरही आम्ही चर्चा केली. राज्यपालांनी आमचा मुद्दा लक्षात घेतला आहे आणि लोकांच्या हितासाठी कार्यवाही सुरू करतील. सरकार स्थापनेचा दावा करणार का? असं विचारलं असता ते म्हणाले की, भाजपचं केंद्रीय नेतृत्व या संदर्भात निर्णय घेईल. अध्यक्ष सत्यव्रत यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तपणे ४४ आमदारांची भेट घेतली आहे. नवीन सरकार स्थापनेला विरोध करणारा कोणीही नाही. लोकांना खूप त्रास होत आहे. गेल्या कार्यकाळात कोविडमुळे दोन वर्षे वाया गेली आणि या कार्यकाळात संघर्षामुळे आणखी दोन वर्षे वाया गेल्याचं त्यांनी सांगितलं.
मे २०२३ मध्ये, भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनी मैतेई आणि कुकी-झो यांच्यातील वांशिक संघर्ष हाताळण्याच्या त्यांच्या सरकारच्या टीकेमुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. सध्या ६० सदस्यांच्या विधानसभेत ५९ आमदार आहेत, त्यापैकी एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये ३२ मैतेई आमदार, तीन मणिपुरी मुस्लिम आमदार आणि नऊ नागा आमदार असे एकूण ४४ आमदार आहेत.
‘पर्यटन संघर्षमुक्त असावं अन् दहशतवाद…; पहलगाममध्येच बैठक घेत ओमर अब्दुल्लांनी दिला महत्त्वाचा संदेश
काँग्रेसचे पाच आमदार आहेत, सर्व मैतेई. याशिवाय, उर्वरित १० आमदार कुकी आहेत, त्यापैकी सात जणांनी भाजपच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीत विजय मिळवला होता, दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आहेत आणि एक अपक्ष आमदार आहे.