फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शुक्रवारी (काल दि. 29 नोव्हेंबर) रात्री उत्तर प्रदेशातील वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकाच्या वाहन पार्किंग परिसरामध्ये भीष आग लागल्याने तब्बल 200 हून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाल्या आहेत. फायर ब्रिगेडने येथे तात्काळ पोहचत शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. रिपोर्ट्नुसार सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथे आग विझवण्यासाठी सुमारे 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. जीआरपी, आरपीएफ, रेल्वे आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने या घटनेचा तपास सुरू केला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढला जात असून या ठिकणी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून त्यांनी पुरावे गोळा केले आहेत. प्रयागराज जीआरपीचे एसपी अभिषेक यादव यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली, आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आणि घटनेची माहिती गोळा केली आहे. जीआरपी एसपीनी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (एडीआरएम) आणि वाराणसी कॅन्ट स्टेशन संचालक यांच्यासोबत बैठकही बोलावली आहे.
More than 200 bikes and scooters of railway employees were burnt to ashes due to a sudden fire caused by a short circuit in the parking lot of Varanasi Cantt Railway Station in UP. This accident happened at 3 am. 6 fire brigade vehicles extinguished the fire after hours of effort pic.twitter.com/ItdxIAdNa1
— Siraj Noorani (@sirajnoorani) November 30, 2024
व्हिडिओ व्हायरल
या भीषण अग्नीतांडवाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये फायर ब्रिगेड आणि पोलीस विभागाचे अधिकारी आग विझवण्यात गुंतले असताना पार्किंग परिसरात मोठी आग असल्याचे दिसत आहे. तसेच त्यासोबतच्या फोटोमध्ये असंख्य दुचाकी भस्मसात झाल्याचे दिसत आहे.
रेल्वे स्थानकावर लागलेल्या आगीसंबंधी रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले की, “मी माझी बाईक रेल्वे स्थानक पार्किंगमध्ये सकाळी 12 च्या सुमारास उभी केली होती. तेथील एका व्यक्तीने मला सांगितले की रात्री 11 च्या सुमारास एक शॉर्ट सर्किट आधीच झाले होते आणि ते काही वेळातच दुरुस्त करण्यात आले, मात्र काही तासांनंतर, एका प्रवाशाने मला सांगितले की तेथे खूप मोठा अपघात झाला आहे. बाहेर आग लागली. मी माझी बाईक बाहेर काढली आणि ती दुसऱ्या बाजूला उभी केली. काही वेळातच आग संपूर्ण पार्किंगमध्ये पसरली,”
या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली.
या आगीत रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या चाइल्ड लाईन कार्यालयाचेही मोठे नुकसान झाले असून फर्निचर, एसी युनिट आणि इतर उपकरणे जळून खाक झाली आहेत.