'पाकिस्तानच्या नागरिकांना शोधा आणि ...'; अमित शहांचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून आपल्या राज्यांमधील पाकिस्तानी नागरिकांना शक्य तितक्या लवकर हद्दपार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Pahalgam Terror Attack: भारताने घेतला पहलगामचा बदला; ‘LET’ च्या टॉप कमांडर अल्ताफ लालीला ठोकला
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरका अॅक्शन मोडमध्ये आहे. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वप्रथम भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाण्याच्या करारास (इंडस वॉटर ट्रीटी) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारताने याबाबत पाकिस्तानला पत्र पाठवले असून, करार रद्द केल्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत काही महत्त्वाचे आणि कडक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णयही समाविष्ट होता.भारत-पाकिस्तान दरम्यान १९६० पासून हा करार अंमलात आहे. सिंधू नदीला पाकिस्तानची जीवनवाहिनी मानले जाते. सुमारे २१ कोटीहून अधिक लोकसंख्या सिंधू आणि तिच्या चार उपनद्यांवर पाण्याच्या गरजांसाठी अवलंबून आहे.
‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठी कारवाई होणार? आता तर विरोधकांकडूनही मिळतीये मोदींना साथ
याशिवाय, अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत देश सोडण्याचा वेळ देण्यात आला आहे.भारतामधील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात कार्यरत डिफेन्स अॅडव्हायझर्सना एक आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही देशांच्या उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५० वरून ३० पर्यंत कमी करण्यात आली आहे. दरम्यान २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तर १७ लोक जखमी झाले होते.
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम या पर्यटनस्थळी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. या हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १७ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर भारत सरकारने तातडीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.