बागेश्वर धाम (Bageshwar Dham) नावाने प्रसिद्ध असेलेले बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री उर्फ बाबा बागेश्वर आजकाल आपल्या चमत्कारिक शक्तीमुळे नेहमी वेगवेगल्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या चमत्कार करण्याच्या शक्तीमुळे त्यांच्या दरबारात लोकं दुरूनदुरून येतात. मात्र, या मनकवड्या बाबाच नाव भलत्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. बागेश्वर बााबाकडे आलेलेल अनेक लोक आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना धाममध्ये गमावत आहेत. म्हणजेच बागेश्वर धाममधून आजपर्यंत अनेक जण बेपत्ता (Missing) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
[read_also content=”आधी धर्मांतर करुन लग्न; नंतर पत्नीची हत्या, 9 वर्षीय मुलीच्या जबाबामुळे वडिलांना जन्मठेपेची शिक्षा https://www.navarashtra.com/crime/9-year-old-girl-testimony-sends-father-to-jail-after-he-killed-his-wife-nrps-397215.html”]
बागेश्वर धाम येथून बेपत्ता झालेल्यांपैकी अनेक जण मानसिक आजारी आहेत आणि गर्दीमुळे कुटुंबापासून विभक्त झालेले अनेकजण आहेत. त्यापैकी कोणाचाही अद्याप पत्ता लागला नाही. हो लोकं अद्यापही आपल्या विभक्त झालेल्या आणि हरवलेल्या लोकांच्या शोधात आहेत.
छतरपूर जिल्ह्याचे पोलिस कॅप्टन अमित सांघी म्हणतात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या इतर 12 लोकांपर्यंत पोहोचण्याचा पोलिस सतत प्रयत्न करत आहेत. कुटुंबीयांकडून तक्रार आल्यानंतर पोलीस बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.
लोकांच्या मनातल्या समस्या हेरुन त्या अचून सांगणारे बाबा बागेश्वर हे सध्या खूप चर्चेत आहेत. बाबा बागेश्वर म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांच वय अवघे २६ वर्षे आहे. त्यांचा जन्म 4 जुलै 1996 रोजी मध्य प्रदेशातील छतरपूर गार्हा गावात झाला. त्यांचे वडील रामकृपाल गर्ग गावातच सत्यनारायणाची कथावाचन करत होते. तर कधी कधी धीरेंद्र शास्त्रीही वडिलांसोबत कथा सांगण्ययास जात होते. घरी दुध विक्रीचा व्यवसाय होता. सुप्रसिद्ध बागेश्वर धाम मंदिर मध्य प्रदेश राज्यातील छत्तरपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्य़ातील गंज शहरापासून गधा गाव सुमारे ३५ किमी अंतरावर असून याच गावात हनुमानजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर परिसर बागेश्वर धाम आणि हनुमान जी बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध आहे. बागेश्वर धाम सरकारचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री आहेत, जे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर म्हणून प्रसिद्ध आहेत. शास्त्री देशभरातील धार्मिक कथा सांगतात. त्याच वेळी, हा कथाकार त्याच्या प्रसिद्ध विधानांमुळे आणि कथांदरम्यान होणारा दैवी दरबार यामुळे सतत चर्चेत असतो.