file photo
नुकतंच काँग्रेस नेते राहुल गांधी (Bharat Jodo yatra) यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. आता येत्या काही दिवसात राहुल गांधी पुन्हा संसदेत दिसू शकतात. नुकतीच त्यांच्या संबधी एक मोठी बातमी समोर येत आहे. राहुल गांधी लवकरच भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo yatra) दुसरा टप्पा सुरू करणार आहेत. यावेळी गुजरातमधून पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. ही यात्रा, गुजरात ते मेघालय अशी काढण्यात येणार आहे.
[read_also content=”गेल्या 30 वर्षापासून ही 67 वर्षीय महिला करतेय रामनामाचा जप! आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त वेळा वहीत लिहिलंय सिताराम https://www.navarashtra.com/india/women-wrote-sitaram-in-book-more-than-crore-times-for-ram-mandir-ayodhya-nrps-442646.html”]
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसची ही भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात सुरू होण्याची शक्याता आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात तळागाळातील लोकांशी संपर्क साधणे, त्यांच्या चिंता समजून घेणे आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा मिळवणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट होते. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधींनी 150 दिवसांपेक्षा जास्त काळ 14 राज्यांचा पायी प्रवास केला.
सात सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीतून पहिली भारत जोडो यात्रा सुरू झाली होती. तब्बल 135 दिवसांचा प्रवास केल्यानंतर 30 जानेवारी 2023 रोजी यात्रेचा समारोप झाला. कन्याकुमारी सुरू झालेली ही यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये येऊन संपली. कन्याकुमारीतून सुरु झालेल्या भारत जोडोयात्रेच्या प्रवासात राहुल गांधी गोरगरीब लोक, व्यापारी, शेतकरी, मजूर, तरुण मुलं, नोकरदार, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स अशा प्रत्येक वर्गातील लोकांना भेटले. कलाकारांनीही यात्रेत हजेरी लावली होती. राहुल गांधींनी त्यांचं म्हणणं जाणून घेतलं. प्रत्येक दिवशी राहुल गांधींनी एक सभा घेतली..तर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषदही घेतली..कन्याकुमारी, तिरुअनंतपूरम, कोची, निलंबूर, म्हैसूर, बेल्लारी, रायचूर, विकाराबाद, नांदेड, जळगाव-जामोद, इंदोर, कोटा, दौसा, अलवर, बुलंदशहर दिल्ली, अंबाला, पठाणकोट आणि जम्मू अशा ठिकाणी मुक्काम करत यात्रेचा शेवट शेर ए काश्मीर स्टेडियमवर झाला.
भारत जोडो यात्रा ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेली एक जनआंदोलन आहे. ज्याचा उद्देश नवी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित विभाजनवादी राजकारणाविरुद्ध देशाला एकत्र आणणे हा आहे. महागाई, बेरोजगारी, राजकीय केंद्रीकरण या विरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांना एतजूट करणे हा त्यामागचा उद्देश होता.