पंतप्रधान मोदींनी लिहीली जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना
PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या चरित्राची प्रस्तावना लिहिली आहे. “आय एम जॉर्जिया – माय रूट्स, माय प्रिन्सिपल्स.” मेलोनी यांनी त्यांचे हे पुस्तक पंतप्रधान मोदींच्या रेडिओ कार्यक्रमाच्या “मन की बात” या शीर्षकापासून प्रेरित असल्याचे वर्णन केले. जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची भारतीय आवृत्ती लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे. रूपा पब्लिकेशन्स हे पुस्तक प्रकाशित करत आहे आणि भारतात या पुस्तकाबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशेष पुस्तकाची प्रस्तावना लिहिणे हा माझ्यासाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे. तसेच, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे वर्णन देशभक्त आणि एक उत्कृष्ट समकालीन नेता असे केले आहे. गेल्या ११ वर्षांत ते अनेक जागतिक नेत्यांना भेटले आहेत. या भेटींमध्ये अनेक जागतिक नेत्यांशी आपण चर्चाही केली. त्या प्रत्येकाचा जीवन प्रवास खूपच वेगळा होता.” असंही त्यांनी प्रस्तावेनत म्हटलं आहे.
इटालियन पंतप्रधान मेलोनी यांचे जीवन आणि नेतृत्व आपल्याला या शाश्वत सत्यांची आठवण करून देते. भारतात, त्यांना एक उत्कृष्ट समकालीन राजकीय नेता आणि देशभक्तीचे एक ताजे उदाहरण म्हणून कौतुक केले जाईल. जगाशी समानतेने संवाद साधताना आपल्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याचा त्यांचा विश्वास आपल्या स्वतःच्या मूल्यांना प्रतिबिंबित करतो. असंही या प्रस्वानेत नमुद करण्यात आले आहे.
Sonam Wangchuk Protest: सोनम वांगचूक यांचे पाकिस्तान कनेक्शन? गीतांजली वांगचूक म्हणाल्या…
पंतप्रधान मोदींनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे खूप कौतुकही केले. पंतप्रधान मोदींनी त्यांचा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक प्रवास भारतीयांमध्ये कसा खोलवर रुजला आहे याचे वर्णन केले. पंतप्रधान मोदींनी आशा व्यक्त केली की हे पुस्तक भारतीय वाचकांमध्ये नक्कीच प्रतिध्वनीत होईल. जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची मूळ आवृत्ती २०२१ मध्ये लिहिली गेली होती. त्यावेळी इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.