दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. ‘मैं नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ की’ असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे ठरले आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा यांनी देखील केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या साक्षीने शिवराजसिंह चौहान यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर महिला केंद्रीय मंत्री म्हणून पहिल्यांदा निर्मला सीतारमन यांनी देखील शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपले स्थान कायम ठेवले आहे. त्यानंतर सुब्रमण्यम जयशंकर यांनी देखील शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेतली आहे. यापूर्वी त्यांनी मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचबरोबर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी देखील शपथ घेतली आहे. शपथविधी सोहळ्याचे एएनआयने फोटो शेअर केले आहेत.
ANI Photo
त्यानंतर कुमारस्वामी व पियूष गोयल यांनी शपथ घेतली. तसेच धरमेंद्र प्रधान यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम मंत्री म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतर बिहारमधील खासदार जीतनराम मांझी यांनी शपथ घेतली. त्याचबरोबर राजीव रजन सिंह व सर्वानंद सोनोवाल यांनी शपथ घेतली. विरेंद्र कुमार, के. आर. नायडू यांनी शपथ घेतली. वयाच्या अगदी 26 व्या वर्षी मंत्रीमंडळामध्ये कामाचा अनुभव मिळालेले युवा नेते म्हणून नायडू यांची ओळख आहे. कर्नाटकच्या धारवाड मधून 5 वेळा खासदारकी मिळवलेले प्रल्हाद जोशी यांनी देखील शपथ घेतली. तसेच गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव यांनी शपथ घेतली. एनडीच्या या शपथविधी सोहळ्यामध्ये गजेंद्रसिंह शेखावत व अन्नपूर्णा देवी यांनी ईश्वराच्या साक्षीने शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनामध्ये पार पडत असलेल्या या शपथविधी सोहळ्यामध्ये किरण रिजूजू, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडविय, जी. किशन रेड्डी यांनी शपथ घेतली. तसेच चिराग पासवान, सी. आर. पाटील, इंद्रजीत सिंह, जितेंद्र सिंह, जयंत चौधरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. अर्जुन राम मेघवाल यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्रामधील खासदारांनी देखील या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेतली. यामध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये नितीन गडकरी यांनी घेतली. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी देखील शपथ घेतली आहे.