नवी दिल्ली : आज लोकसभेत पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना विरोधी पक्षांवर जोरदार पलटवार करीत त्यांची आतापर्यंतच्या चुकांवर बोट ठेवले. परंतु, पंतप्रधान मणिपूरवर लवकर चर्चा करीत नसल्याने विरोधक सभागृहाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधानांनी मणिपूरवर बोलताना, तेथील माता-भगिनींसोबत पूर्ण देश आहे. त्यांनी घाबरू नये, आमचा पूर्ण पक्ष येथील संसदीय सभासद त्यांच्याबरोबर आहे.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावर चर्चा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर बोलताना त्यांचे जुने अनुभव सांगताना, येथील समस्यांची जननी कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसने त्यांच्या काळात नॉर्थ इस्ट नेहमीच दुय्यम भाव दिला. त्यांच्यासाठी ही व्होटींग बॅंक नसल्याने तेथे त्यांनी कधीच विकास केला नाही.
निष्पाप लोकांवर वायूसेनेने केला हल्ला
५ मार्च १९६६ या दिवशी काँग्रेसने असहाय जनतेवार वायु सेनेसह मिझोरामवर हल्ला केला. निष्पाप नागरिकांवर हल्ले केले. संपूर्ण मिझोरम ५ मार्चला विसरलेले नाही. आजदेखील ती जखम भरून काढण्याचा कोणताही प्रयत्न कॉंग्रेसने केलेला नाही. काँग्रेसने हे सत्य देशापासून लपवून ठेवले आहे.
निष्पाप लोकांवर वायूसेनेने केला हल्ला
इंदिरा गांधींनी अकाल तख्तवर हल्ला केला, तसेच ईशान्येकडील लोकांच्या श्रद्धेचा त्यांनी घात केला. दुसऱ्या घटनेचे वर्णन 1962 च्या खोपनाक रेडिओवरून प्रसारित झालेल्या पंडित नेहरूंनी चीनने ज्यावेळी देशावर हल्ला केला. लोक त्यांच्या हक्काच्या हक्कासाठी मैदानात उतरले होते. त्यावेळी नेहरूंनी त्यांच्या मदतीसाठी काहीही केले नाही. तेथील लोकांना वाऱ्यावर सोडून दिले.
लोहियाजींचे नेहरूंवर गंभीर आरोप
नेहरूजींनी आसामच्या लोकांना त्यांच्या नशिबी सोडले होते. लोहियाजींचे वारस म्हणणारे लोक लोहियाजींनी नेहरूजींवर गंभीर आरोप केले होते, मुद्दाम नेहरूजी ईशान्येचा विकास करत नाहीत. असा गंभीर आरोप केला गेला. तेव्हा कुठे गेले होते कॉंग्रेस.
30,000 किमी क्षेत्र कोल्ड स्टोरेजमध्ये बंद करावे किंवा ईशान्य भारताला देशाच्या विकासापासून कायम बाजूला ठेवत कॉंग्रेसने दुय्यम वागणूक दिली आहे. कॉंग्रेस मणिपूरमध्ये केवळ सीटांचे राजकारण पाहत आली आहे. ज्या ठिकाणी एक-दोन सीट मिळतात तिथल्या नागरिकांशी ते सावत्र आईप्रमाणे वागला आहे.
ईशान्य भारताची समस्यांची जननी काँग्रेस पक्ष
आमच्यासाठी ईशान्य हा आमच्या हृदयाचा तुकडा आहे. मणिपूरची समस्या नुकतीच समोर आल्याचे सांगितले जात आहे. परंतु, ईशान्य भारताची समस्यांची जननी काँग्रेस पक्ष आहे. येथील अडचणीचे मुख्य कारण काँग्रेसचे राजकारण आहे.
आमचा हा भाग काँग्रेसच्या राजवटीत वेगळेपणाच्या आगीत ईशान्य भारत जळून खाक झाला. प्रत्येक यंत्रणा अतिरेकी संघटनेच्या इशाऱ्यावर चालत असे. सरकारी कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो लावायला विरोध केला होता तेव्हा तर काँग्रेसचे सरकार होते.






