कन्याकुमारी : लोकसभा निवडणूकीचे उद्याचे शेवटच्या सातव्य टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मागील दीड महिन्यांपासून देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला होता. एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी चुरशीची लढत सर्वत्र दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी आणि 400 चा आकडा पार करण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार केला. नरेंद्र मोदी यांनी देखील देशभर दौरे करत सभांचा सपाटा लावला होता. या प्रचाराच्या धामधुमीनंतर नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत.
भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल (दि.30) कन्याकुमारीला रवाना झाले. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या ‘रॉक मेमोरियल’ या स्मारक स्थळाला त्यांनी भेट देत ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. काल सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेला बसले आहेत. मोदींची ही ध्यानधारणा अवघ्या काही तासांची नसून तब्बल 45 तासांची असणार आहे. जवळजवळ दोन दिवस नरेंद्र मोदी हे ध्यानाला बसणार आहेत. त्याचबरोबर 45 तास त्यांचे मौन देखील पाळणार आहेत. या संपूर्ण 45 तासांच्या ध्यानधारणेमध्ये मोदी कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करणार नसल्याचे देखील भाजप नेत्यांकडून सांगण्यात येणार आहे. संपूर्ण ध्यानधारणा नरेंद्र मोदी लिक्विट डाईटवर करणार आहेत.
नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरु
#WATCH | Kanniyakumari, Tamil Nadu | PM Narendra Modi meditates at the Vivekananda Rock Memorial, where Swami Vivekananda did meditation. He will meditate here till 1st June pic.twitter.com/X4bvAdgZLs
— ANI (@ANI) May 31, 2024
भाजप नेत्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ध्यानमंडपमध्ये नरेंद्र मोदी ध्यानमग्न अवस्थेत राहणार आहेत. त्या जागी अध्यात्मिक विभूती असणाऱ्या विवेकानंदांना याच ठिकाणी ‘भारतमाता’ संबंधी दिव्यदृष्टी मिळाली होती. विवेकानंदांनी या जागी ध्यानधारणा केली होती. भारतभर भ्रमण करुन या ठिकाणी तीन दिवस ध्यान करत विकसित भारताचे स्वप्न विवेकानंदांनी पाहिले होते. त्या जागी नरेंद्र मोदी देखील ध्यान करणार आहेत, अशी भावना भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. काल नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमध्ये येऊन भगवती अम्मान यांची पूजा अर्चना केली. त्यानंतर विवेकानंद ‘रॉक मेमोरियल’मध्ये ध्यानधारणेला सुरुवात केली.
नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा शेवट होणार ‘ध्यान’ करुन; कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकला देणार भेट