पावसाबाबत महत्त्वाची बातमी; अंदमानात 13 मे रोजी मान्सून होणार दाखल (File Photo : Rain News)
नवी दिल्ली : फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे. त्यानुसार, आता देशात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानातही चढ-उतार होऊ शकतो, असा अंदाज आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येथे वीज कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेदेखील वाचा : देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता; दिल्ली, नोएडासह मुंबईत पावसाचा अंदाज
याशिवाय मिझोरम, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगाल, झारखंड, ओडिशा, केरळ आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील बहुतेक भागात हवामान स्वच्छ राहिले. काश्मीरच्या डोंगराळ राज्यात सतत बर्फवृष्टी होत असल्याने थंडी पुन्हा वाढली आहे. हिमाचलमध्येही अनेक ठिकाणी तापमान उणेमध्ये नोंदवले जात आहे.
बिहारमध्येही हवामान कोरडे आहे, त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात पुन्हा एकदा घट झाली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसामुळे परिस्थिती गंभीर आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने देशातील 15 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राजस्थानमधील हवामानात बदल झाल्यामुळे रात्रीच्या थंडीत पुन्हा एकदा वाढ झाली. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान काश्मीरमध्ये पुन्हा पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. या वर्षी काश्मीरमध्ये हिवाळा बहुतांश कोरडा राहिला. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुमारे 80% कमी पाऊस पडला.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. देशाच्या अनेक भागात हवामान बदलत आहे. असे असताना दिल्ली, नोएडा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मुंबईत पावसाची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. तापमानातही चढ-उतार होऊ शकतो, असा अंदाज होता. दिल्लीत हलका पाऊस आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोएडामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता इतर 15 राज्यांत पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.