पंतप्रधान मोदींनी तिरुपती बालाजी चरणी लीन! पूजा करत भगवान व्यंकटेश्वराचे घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. रविवारी तिरुपतीला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी सोमवारी सकाळी तिरुमला मंदिरातील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली.

  सध्या तेलंगणात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या 30 नोव्हेंबरला तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर नेत्यांनी सभा घेण्याचा धडका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेलंगणातील अनेक जाहीर सभांना संबोधित केलं. यानंतर त्यांनी रविवारी संध्याकाळी तिरुपतीला देवस्थानला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिरुमला सोमवारी सकाळी येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराला (Tirupati Balaji) भेट देत पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना केली. यावेळी पीएम मोदी पारंपरिक पूजेच्या पोशाख परिधान केला होता.

  रविवारी संध्याकाळी ७.४० वाजता पंतप्रधान तिरुपतीजवळील रेनिगुंटा विमानतळावर उतरले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर आज सकाळी त्यांनी तिरुपतीला देवस्थानला भेट दिली.

  मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधान दुपारी 12:45 वाजता महबूबाबाद येथील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. महबूबाबाद येथील सभेनंतर ते तेलंगणातील करीमनगर येथे दुपारी २:४५ वाजता होणाऱ्या दुसऱ्या जाहीर सभेला संबोधित करतील. आज संध्याकाळी ५ वाजता पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये रोड शो करून दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता करतील.

  तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान

  रविवारी पंतप्रधान मोदी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीत सहभागी झाले होते. तेथील जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना गरिबांचे शत्रू म्हटले.

  तिसऱ्या तेलंगणा विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होत आहे.