पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिझोरामला भेट (फोटो- ट्विटर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुर राज्याच्या दौऱ्यावर
पंतप्रधान मोदींकडून 9 हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन
मिझोराममध्ये पहिल्यांदाच धावणार रेल्वे
PM Narendra Modi: आज पूर्वेकडील राज्य असलेल्या मिझोराम देशासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तेथील नागरिकांसाठी खुशखबर आहे. आज ऐतिहासिक दिवस असून, मिझोराम राज्य पहिल्यांदाच रेल्वेच्या नकाशावर आले आहे. आजपासून मिझोराम राज्यात रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामला ही छान भेट दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मणिपूरला देखील भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी मिझोराम राज्याचा दौरा केला आहे. मिझोराम राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 9 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी मिझोरामच्या नागरिकांना रेल्वे देखील भेट दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मिझोराममध्ये पहिल्या रेल्वे लाईनचे उद्घाटन केले आहे. राजधानी एक्सप्रेस आणि आणखी तीन रेल्वेला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. बैराबी-सैरांग नवीन रेल्वे लाइन राष्ट्राला समर्पित केली आहे. यामुळे आता मिझोराम देखील विकासाच्या मार्गवर आले आहे.
A landmark day for Mizoram as it joins India's railway map! Key infrastructure projects are also being initiated. Speaking at a programme in Aizawl. https://t.co/MxM6c2WZHZ
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025
बैराबी-सैरांग हा रेल्वे मार्ग 51.38 किमी लांबीचा आहे. यासाठी 8,070 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 2015 मध्ये या मार्गाचे काम सुरू झाले होते. 2008-2009 मध्ये या मार्गाला मंजूरी मिळाली होती. या मार्गवार 45 बोगदे, 55 मोठे व 87 लहान पूल आहेत. याशिवाय मोदी यांनी आणखी तीन रेल्वे मार्गाना हिरवा झेंडा दाखवला आहे. यामध्ये सायरंग ते दिल्ली, सायरंग- गुवाहाटी एक्सप्रेस, सायरंग-कोलकाता एक्सप्रेस या रेल्वेला मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच मणिपूर पेटले
मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर आणि बॅनर अतिरेक्यांनी फाडले, बॅरिकेड्स पाडले आणि त्यांना आग लावली. ही घटना चुराचंदपूर पोलिस ठाण्यापासून सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या पिसोनामुन गावात घडली. सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना हाकलून लावले. लाठीचार्जही करण्यात आला. मणिपूरचे एकमेव राज्यसभा खासदार लेशेम्बा सानाजाओबा यांनी पंतप्रधानांच्या भेटीला राज्यासाठी खूप महत्त्वाचे म्हटले. यातून अनेक सकारात्मक बदल दिसून येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांच्या दौऱ्याआधीच मणिपूर पेटले; अनेक ठिकाणचे पोस्टर्स बॅनरही फाडले
दरम्यान, पंतप्रधान मोदी मणिपूरला 8500 कोटी रुपयांची भेट देणार आहेत. चुराचंदपूरमधील पीस ग्राउंडवरून मोदी 7300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. हा भाग कुकीबहुल आहे. यासोबतच पंतप्रधान मैतेई बहुल क्षेत्र असलेल्या इम्फाळ येथून 1200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील.