देशभरात 12 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी याबाबत घोषणा केली. त्यानंतर आता नरेंद्र मोंदी नवी घोषणा केली असून देशात लवकरत 6G सेवा सुरु होणार असल्याचं सांगितलं आहे. ‘स्मार्ट इंडिया हॅकथॉन’ (Smart India Hackathon 2022) या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे.
[read_also content=”मोठी बातमी! देशात ‘या’ तारखेपासून सुरु होणार 5G सेवा https://www.navarashtra.com/india/5g-internet-service-to-start-in-the-country-from-october-in-nrps-319523.html”]
देशात अनेक दिवसापासून 5G (5G Internet) सेवा सुरु होणार असल्याचं सांगण्यात येतं होतं. इंटरनेट वापरकर्तेही याची प्रतिक्षा करत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत सेवा सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
5जी सेवा देशभरात सगळीकडे पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. 2030पर्यंत भारतात 6जी (6G) सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
[read_also content=”टीईटी घोटाळा : मंत्री अब्दुल सत्तरांच्या मुलीचा हा पुरावा आला समोर , सिल्लोड ते सांगली कनेक्शन https://www.navarashtra.com/maharashtra/tet-scam-this-evidence-of-minister-abdul-sattars-daughter-has-surfaced-sillod-to-sangli-connection-nrab-319512.html”]






