राहुल गांधी परदेश दौऱ्याावर; चार देशांना देणार भेटी, Congressने दिली माहिती
Rahul Gandhi News: बिहारमधील मतदार अधिकार यात्रेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी दक्षिण अमेरिकेतील चार देशांच्या दौऱ्यावर निघाल्याची माहिती समोर आली आहे. या अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी राजकीय नेते, विद्यार्थी आणि व्यावसायिक नेत्यांना भेटणार आहेत. काँग्रेसच्या मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रभारी पवन खेरा यांनी त्यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. पण त्याचवेळी राहुल गांधी कोणत्या देशांना भेटी देणार आहेत, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
पवन खेरा यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी दक्षिण अमेरिकेच्या चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. तेथे ते राजकीय नेते, विद्यापीठ विद्यार्थी आणि उद्योग आणि व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधतील.”
“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
राहुल गांधी ब्राझील आणि कोलंबियाला भेट देतील, जिथे ते विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताला व्यापार आणि भागीदारीमध्ये विविधता आणण्याच्या संधींचा शोध घेण्यासाठी ते व्यावसायिक नेत्यांशी चर्चा देखील करतील. तसेच, भारत आणि दक्षिण अमेरिकेचे अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीद्वारे, जागतिक दक्षिणेची एकता आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेसाठी वचनबद्धतेद्वारे दीर्घकालीन संबंध आहेत.
सप्टेंबरमध्ये राहुल गांधींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांनी यापूर्वी मलेशियाला भेट दिली होती. पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नव्हते. राहुल गांधींच्या मलेशिया दौऱ्यावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भाजपनेही त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या सुरक्षा पथकानेही राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावर आक्षेप व्यक्त केला होता.
China Taiwan War : चीन लवकरच करणार तैवान काबीज; 800 पानांच्या एका कागदपत्रातून ड्रॅगनची कुटील
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांनी गेल्या महिन्यात बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढण्यात आली. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र, हरियाणा यासह कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत झालेल्या मतचोरीचे गंभीर आरोप केले होते. तसेच, बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रियेविरुद्ध जनजागृती करणे हादेखील या यात्रेचा उद्देश होता. त्यानंतर बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही यात्रा काढली होती. बिहारचे आरजेडी नेते तेजस्वी यादव हेदेखील त्यांच्यासोबत या यात्रेत सहभागी झाले होते.
राहुल गांधी यांची मतदार हक्क यात्रा १७ ऑगस्ट रोजी सासाराम येथून सुरू झाली. ही यात्रा १७ व्या दिवशी १ सप्टेंबर रोजी गांधी-आंबेडकर मार्च म्हणून संपली. राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रा’ने बिहारच्या विरोधी राजकारणात निश्चितच नवीन ऊर्जा निर्माण केली आहे. २३ जिल्हे आणि ५० विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला १६ दिवसांचा, १,३०० किमीचा हा प्रवास १ सप्टेंबर रोजी पाटणा येथे संपला. या प्रवासाचा मुख्य उद्देश विशेष सघन सुधारणा (SIR) प्रक्रियेविरुद्ध जनजागृती करणे हा होता.