राहुल गांधींनी केदारनाथमध्ये घेतंल दर्शन, मंदिर परिसरात केलं प्रसाद वाटप, पाहा व्हिडिओ!

काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'x' वर आपल्या अधिकृत अकाऊंटवर राहुल गांधींच्या केदारनाथ यात्रेचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत

    केदारनाथ : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi In Kedarnath )तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी केदारनाथ धामला भेट दिली. यावेळी राहुलनेही आरतीमध्ये सहभाग घेतला. तिथून एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये राहुल गांधी मंदिर परिसरात प्रसाद वाटप करताना दिसत आहेत.

    काँग्रेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘x’ वर आपल्या अधिकृत अकाऊंटवर यात्रेचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये वायनाडचे खासदार राहुल गांधी आरतीमध्ये सहभागी होताना, केदारनाथ मंदिरात भक्तांना चहा देताना आणि मंदिर परिसरात भाविकांना प्रसाद वाटताना दिसले.