किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज ऑल-न्यू सेल्टोस श्रेणीत नवीन जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ) व्हेरिएंट्स लाँच केले आहेत, ज्यांची किंमत २,१,५६,९०० रूपयांपासून सुरू होते. या सेगमेंटमध्ये बेंचमार्क ठरलेल्या आपल्या ५-स्टार भारत एनसीएपी सुरक्षा रेटिंगच्या पाठबळासह सेल्टोसच्या या नवीन मॉडेल्समध्ये प्रगत सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रीमियम सुविधा आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी ही कार अधिक फायदेशीर आणि आकर्षक बनली आहे.
सेल्टोस जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ)मध्ये कियाचे सेगमेंटमधील आघाडीचे एडीएएस एफ+ पॅकेज सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये २८ प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जसे फ्रंट कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट – जंक्शन क्रॉसिंग (एफसीए-जेसी), फ्रंट कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट – लेन चेंज ऑनकमिंग (एफसीए-एलओ), फ्रंट कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट – लेन चेंज साईड (एफसीए-एलएस), फ्रंट कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट विथ इव्हेसिव्ह स्टिअरिंग असिस्ट (एफसीए-डब्ल्यू/ईएसए), नेव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट क्रूझ कंट्रोल – झोन (एनएससीसी-झेड), नेव्हिगेशन-बेस्ड स्मार्ट क्रूझ कंट्रोल – कर्व्ह (एनएससीसी-सी), हायवे ड्रायव्हिंग असिस्ट (एचडीए).
टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
अत्याधुनिक सुरक्षेच्या पलीकडे जात जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ) व्हेरिएंट्स कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिट (सीसीएनसी), ८५ हून अधिक वैशिष्ट्यांसह किया कनेक्ट २.०, प्रादेशिक भाषांमध्ये व्हॉईस-एनेबल्ड सोयीस्कर सुविधा, डिजिटल की, हेड-अप डिस्प्ले – विंडशील्ड प्रोजेक्शन, एक्यूआय डिस्प्लेसह स्मार्ट एअर प्युरिफायर, रेन सेन्सिंग वायपर्स, फ्रंट आणि रिअर कॅमेरा (मोबाईल अॅपसह) असलेला स्मार्ट डॅशकॅम, आणि सर्व पॉवर विंडोजसाठी सुरक्षा सुविधेसह वन-टच ऑटो अप/डाऊन यांसारख्या वैशिष्ट्यांद्वारे दैनंदिन प्रवास अधिक सुकर करतात.
या लाँचबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे मार्केटिंग आणि सेल्सचे सीनियर व्हाईस-प्रेसिडेंट अतुल सूद म्हणाले, “ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांनुसार सेल्टोसमध्ये सातत्याने बदल झाले आहेत आणि तरीही ही वेईकल भारतातील कियाची सर्वात खास उत्पादन राहिली आहे. अलीकडेच मिळालेल्या ५-स्टार भारत एनसीएपी सुरक्षा रेटिंगमुळे सेल्टोस ही आजवरची भारतातील सर्वाधिक स्कोअर करणारी आयसीई वेईकल ठरली आहे. या यशाने या कारमागील इंजिनिअरिंगची ताकद आणि ग्राहकांच्या गरजांकडे दिलेले लक्ष यांना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले आहे, तसेच या सेगमेंटमध्ये सुरक्षेचा नवीन मानदंड स्थापित केला आहे. नवीन जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ) व्हेरिएंट्सच्या सादरीकरणासह आम्ही प्रगत सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि प्रीमियम सोयी-सुविधांची आमची सर्वात सर्वसमावेशक वैशिष्ट्ये एकाच वेईकलमध्ये आणली आहेत, ज्यासह ऑल-न्यू सेल्टोसला अधिक दृढ करत आहोत. यामुळे डिझाइन, जागा आणि तंत्रज्ञानामध्ये सातत्याने नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या सेल्टोसचे प्रीमियम आकर्षण आणखी वाढेल.”
लाँच झाल्यापासून, ऑल-न्यू सेल्टोसने भारतातील सर्वात यशस्वी मिड-एसयूव्ही म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या प्रबळ मूल्य आणि सातत्यपूर्ण प्रगतीमुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. ऑल-न्यू सेल्टोसने लाँच झाल्यापासून दरमहा १०,००० हून अधिक वेईकल्सच्या विक्रीची नोंद केली आहे, ज्यामधून ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास आणि मागणी दिसून येते.
जीटीएक्स(ओ) आणि एक्स-लाइन(ओ) व्हेरिएंट्सच्या समावेशासह किया इंडियाने प्रगत सुरक्षा, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि प्रीमियम सोयी-सुविधांचे अधिक समृद्ध संयोजन ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे ऑल-न्यू सेल्टोसचा पोर्टफोलिओ अधिक विस्तारला आहे. १०.९९ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होणारी ही श्रेणी ग्राहकांना विविध व्हेरिएंट्समध्ये उत्तम पर्याय उपलब्ध करून देते, तसेच मिड-एसयूव्ही सेगमेंटमधील सर्वात आकर्षक आणि प्रबळ कार म्हणून सेल्टोसचे स्थान अधिक दृढ करते.






