Rail Neer (Photo Credit - X)
Rail Neer Price: देशात जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून (रविवार, १२ वाजेपासून) होणार आहे. त्यामुळे सोमवारपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून याचा फायदा लोकांना मिळणार आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे अनेक उत्पादनांच्या किमती कमी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आपल्या ‘रेल नीर’ (Rail Neer) या बाटलीबंद पाण्याची किंमत एक रुपयाने कमी केली आहे. हे नवे दर २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार, ‘रेल नीर’ च्या सर्व बाटल्यांच्या किमतीत एक रुपयाची कपात करण्यात आली आहे. या आदेशात म्हटले आहे की, आता ‘रेल नीर’च्या एक लिटर बाटलीची किंमत १५ रुपयांवरून १४ रुपये आणि ५०० मिलीलीटरच्या बाटलीची किंमत १० रुपयांवरून ९ रुपये करण्यात आली आहे.
सफर में सेहत और बचत, दोनों साथ!
मिनरल्स से भरपूर पानी-रेल नीर, अब और भी किफायती।#NextGenGST pic.twitter.com/JzNk9fX8de— Ministry of Railways (@RailMinIndia) September 20, 2025
यासोबतच, रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या आयआरसीटीसी/रेल्वेने सूचीबद्ध केलेल्या इतर कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची कमाल किरकोळ किंमत (MRP) सुद्धा कमी करण्यात आली आहे. त्यामुळे, आता कोणत्याही ब्रँडची एक लिटर पाण्याची बाटली १४ रुपयांपेक्षा जास्त आणि ५०० मिलीलीटरची बाटली ९ रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकता येणार नाही.
जर कोणताही विक्रेता किंवा दुकानदार ‘रेल नीर’ किंवा इतर बाटलीबंद पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेत असेल, तर तुम्ही पुढील प्रकारे तक्रार करू शकता:
तक्रार करताना पाण्याच्या बाटलीचा फोटो, तुम्ही घेतलेली पावती आणि स्टेशनचे नाव देणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाईल.