• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Pm Modi Gst Savings Festival Aatmanirbhar

PM Narendra Modi Speech: पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; भारतात उद्यापासून ‘जीएसटी बचत उत्सव’, देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, उद्यापासून देशात आनंद वाढेल. ९९% वस्तूंवर फक्त ५% कर आकारला जाईल. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला गती मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 21, 2025 | 05:47 PM
PM Naredra Modi (Photo Credit- X)

PM Naredra Modi (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
  • भारतात उद्यापासून ‘जीएसटी बचत उत्सव’
  • देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन
PM Narendra Modi Speech: देशाच्या नागरिकांना रविवारी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव सुरू होत असल्याची घोषणा केली. या महोत्सवामुळे सर्वसामान्यांची बचत वाढेल, तसेच त्यांना हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करता येतील, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

जीएसटी बचत महोत्सवामुळे सर्वांना फायदा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा बचत महोत्सव देशातील प्रत्येक नागरिकासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे ग्राहकांना खरेदी करताना मोठी सूट मिळेल आणि देशाच्या विकासालाही गती मिळेल.”

#WATCH | Prime Minister Narendra Modi says, “Tyohaaro ke iss mausam mein sabka muh meetha hoga. Desh ke har pariwar ki khushiya badhegi… I extend my heartfelt congratulations and best wishes to millions of families across the country for the Next Generation GST reforms and… pic.twitter.com/by2clKMGPR — ANI (@ANI) September 21, 2025

पंतप्रधानांनी जीएसटी लागू होण्यापूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले, “पूर्वी देशातील नागरिकांना विविध करांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकावे लागत होते. तसेच, एका शहरातून दुसऱ्या शहरात वस्तू पाठवणेही खूप कठीण होते. ग्राहकांना अनेकदा शिपिंगचा अतिरिक्त खर्चही द्यावा लागत होता.”

२०१७ पासून जीएसटीचा नवा अध्याय

२०१७ मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर देशात कर सुधारणांचा एक नवा अध्याय सुरू झाला. पंतप्रधान मोदींनी जीएसटीला स्वतंत्र भारताची सर्वात मोठी कर सुधारणा म्हटले. त्यांनी सांगितले की, ‘ही सुधारणा सर्व घटकांना सोबत घेऊन करण्यात आली असून, ती देशाच्या विकासगाथेला आणखी गती देईल.’

MSME क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. ‘स्वदेशी’ आणि उत्पादनांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “भारतात बनलेल्या वस्तूंची गुणवत्ता पूर्वीही सर्वोत्तम होती. आता आपल्याला तो गौरव पुन्हा प्राप्त करायचा आहे.”

जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करा

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लघु उद्योगांनी असे उत्पादन तयार करावे, जे जगाच्या बाजारपेठेत अभिमानाने आणि प्रत्येक कसोटीवर खरे उतरतील. याच ध्येयाने आपल्याला काम करायचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ज्याप्रमाणे ‘स्वदेश’ या मंत्राने बळ दिले, त्याचप्रमाणे समृद्धीलाही ‘स्वदेशी’च्या मंत्रानेच बळ मिळेल.

GST 2.0: उद्यापासून नवीन GST दर लागू होणार; ‘या’ वस्तू GST मुक्त असतील, पहा संपूर्ण यादी

‘गर्व से कहो, हम स्वदेशी है’

‘जाणूनबुजून किंवा नकळत कितीतरी परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत, हे आपल्याला कळतही नाही. आता आपल्याला स्वदेशी वस्तूंवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘आपण स्वदेशी आहोत आणि स्वदेशीच विकतो’, असे अभिमानाने सांगा,’ असे आवाहन त्यांनी केले. असे झाल्यास भारताचा विकास अधिक वेगाने होईल, असेही ते म्हणाले.

राज्य सरकारांना खास आवाहन

पंतप्रधान मोदींनी सर्व राज्य सरकारांना ‘आत्मनिर्भर भारत’ आणि स्वदेशी अभियानासोबत जोडून आपल्या राज्यात उत्पादन क्षेत्राला गती देण्याचे आवाहन केले. देशातील प्रत्येक राज्य विकसित व्हावे आणि भारत एक विकसित राष्ट्र बनावे, यासाठी गुंतवणुकीचे चांगले वातावरण तयार करा, असेही त्यांनी सांगितले.

आता ९९% वस्तूंवर फक्त ५% कर

ते पुढे म्हणाले की, आता जीएसटीमध्ये केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब असतील. यामुळे, खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषधे आणि इतर अनेक वस्तू स्वस्त होतील किंवा त्यांच्यावर फक्त ५ टक्के कर लागेल.पंतप्रधान मोदींनी सांगितले की, जीएसटीच्या या नवीन रचनेमुळे जवळपास ९९ टक्के वस्तू आता ५ टक्के कराच्या कक्षेत आल्या आहेत. यामुळे सामान्य नागरिकांची मोठी बचत होईल.

नवीन मध्यमवर्गासाठी मोठी भेट

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशातील २५ कोटींहून अधिक लोकांनी भारताला प्रगतीच्या दिशेने पुढे नेले आहे. हा समूह ‘नवीन मध्यमवर्ग’ म्हणून एक मोठी भूमिका बजावत आहे आणि त्यांची स्वतःची स्वप्ने आहेत. या नवीन मध्यमवर्गाला लक्षात घेऊन, सरकारने या वर्षी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करमुक्त करून त्यांना एक मोठी भेट दिली आहे.

Web Title: Pm modi gst savings festival aatmanirbhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 05:33 PM

Topics:  

  • GST Rates
  • Nation News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral
1

एकाग्र लक्ष, ठाम हावभाव; अर्थसंकल्पीय भाषणात PM मोदींच्या टेबल थापांनी वेधलं सर्वांचं लक्ष; Video Viral

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य
2

Israel Visit : Epstein Files मध्ये PM Modi यांचे नाव; भारताने अमेरिकेला सुनावले खडेबोल; जाणून घ्या काय आहे ‘त्या’ ईमेलचे सत्य

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
3

Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास जलद गतीने होणार! निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

LPG Price : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; एलपीजी सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला
4

LPG Price : अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; एलपीजी सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या शालीची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्य, सांस्कृतिक ओळखीचा संदेश

Budget 2026: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेल्या शालीची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्य, सांस्कृतिक ओळखीचा संदेश

Feb 01, 2026 | 01:39 PM
कोल्हापुरकरांना मिळणार 5 वर्षात 6 महापौर! नेमकं काय आहे महायुतीचा फॉर्म्युला?

कोल्हापुरकरांना मिळणार 5 वर्षात 6 महापौर! नेमकं काय आहे महायुतीचा फॉर्म्युला?

Feb 01, 2026 | 01:38 PM
महिलेला ‘चेटकीण’ म्हटल्यास तरुंगवास, ओडिशा मानवाधिकार आयोगाची कठोर शिफारस

महिलेला ‘चेटकीण’ म्हटल्यास तरुंगवास, ओडिशा मानवाधिकार आयोगाची कठोर शिफारस

Feb 01, 2026 | 01:38 PM
Union Budget 2026: वित्तीय शिस्तीवर सरकारचा भर; तुटीचे प्रमाण ४.३% वर आणण्याची घोषणा

Union Budget 2026: वित्तीय शिस्तीवर सरकारचा भर; तुटीचे प्रमाण ४.३% वर आणण्याची घोषणा

Feb 01, 2026 | 01:32 PM
शपथविधीचा निर्णय राष्ट्रवादी, त्यात आमची ढवळाढवळ नाही;  भाजप नेते मंत्री बावनकुळे यांंनी स्पष्टच सांगितलं

शपथविधीचा निर्णय राष्ट्रवादी, त्यात आमची ढवळाढवळ नाही; भाजप नेते मंत्री बावनकुळे यांंनी स्पष्टच सांगितलं

Feb 01, 2026 | 01:22 PM
NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त

NCP President : ‘माझ्या निवडीच्या बातम्या निराधार, त्यात काहीही तथ्य नाही’; प्रफुल्ल पटेल यांनी फेटाळले ‘ते’ वृत्त

Feb 01, 2026 | 01:18 PM
Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

Pune ZP Election 2026 : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय घराणी केंद्रस्थानी; नातेसंबंधातून उमेदवारीचा प्रभाव

Feb 01, 2026 | 01:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.