Ratan tata death live updates: रतन टाटा यांच्या निधनावर अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या राजकीय शोकाचा अर्थ काय?
Ratan Tata death news live updates: देशातील उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज शासकीय इतमात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देशातच नव्हे, तर परदेशातही दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा सन्मान झाला आहे. भारतीय औद्योगिक जागत टाटांची स्वतःची वेगळी ओळख आहे. टाटा यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे.
रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश-विदेशातील अनेक मोठ्या व्यक्तींनी आणि सर्वसामान्यांनी शोक व्यक्त केला आहे. काही राज्यांमध्ये राजकीय शोकही पाळण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यात शोक जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील. तसेच आज रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम आज होणार नाहीत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. शिवाय झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही राज्यात राजकीय शोक जाहीर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनावर अनेक ठिकाणी जाहीर झालेल्या राजकीय शोकाचा नेमका अर्थ काय हे आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
यापूर्वी राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य शोक जाहीर करायचे. मात्र काही काळापूर्वी नियम बदलून हे अधिकार राज्यांना देण्यात आले. त्यानंतर आता राज्याचा सन्मान कोणाला द्यायचा हे राज्य स्वतः ठरवतात. कोणत्या व्यक्तिच्या निधनानंतर राज्यात राज्य शोक व्यक्त केला जाईल, हा निर्णय आता राज्यांव्दारे घेतला जातो.
हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे लेआ, माया आणि नेव्हिल आहेत तरी कोण?
वास्तविक, राज्य सुट्टी म्हणजे ज्या दिवशी सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर सरकारी संस्था बंद असतात. या दिवशी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सुट्टी असते. राज्याच्या सुट्या अनेकदा काही खास प्रसंगी येतात. ज्यामध्ये प्रमुख व्यक्तींच्या निधनाच्या सन्मानार्थ राज्यसुट्टी घोषित केली जाते. लोकांना त्या दिवसाचे महत्त्व समजावे आणि एकत्र येऊन श्रद्धांजली वाहावी हा यामागचा उद्देश आहे. कोणत्याही मोठ्या राजकारण्याचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे निधन झाले की, सरकार राज्य शोक जाहीर करते. जेव्हा एखाद्या राजकारण्यासाठी किंवा व्यक्तिमत्त्वासाठी राज्य शोक जाहीर केला जातो, तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार पूर्ण राज्य सन्मानाने केले जातात.
यापूर्वी केवळ पंतप्रधान, राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री (भूतकाळातील किंवा सध्या पदावर असलेले) यांच्या निधनावर राज्य शोक जाहीर केला जात होता. आता हा नियम बदलण्यात आला आहे. आता हा सन्मान त्या सर्व व्यक्तिमत्त्वांना दिला जातो ज्यांनी देशाचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. आता हा राज्य सन्मान राजकारण, विज्ञान, साहित्य, कला, कायदा अशा सर्व क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.