लाल किल्ला दिल्ली बॉम्ब स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याची माहिती समोर आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Delhi Blast : दिल्ली : दहशवताद्यांकडून भारताची राजधानी दिल्लीला टार्गेट करण्यात आले आहे. News 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला झाल्याचे समोर आले आहे. याम हल्ल्यामध्ये 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये 24 लोक भीषण जखमी झाले आहेत. ही घटना दहशतवादी घटना असल्याची शक्यता वर्तवली जात होती. News 18 ने दिलेल्या वृत्तानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी एका संशयीत व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील लाल किल्ली मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ आज सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये धमाका झाला. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. धमाकीची तीव्रता एवढी जास्त होती की लाल किल्ल्याजवळ स्थित असलेल्या लाल मंदिरात गाडीचा एक भाग येऊन पडला. याशिवाय या ब्लास्टच्या तीव्रतेने मंदिराचे आरसे तुटले आणि जवळपास असलेल्या अनेक दुकांनांचे दरवाजे आणि खिडक्यांचे देखील नुकसान झाले होते. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे ३० लोकं जखमी झाल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. हरयाणा मधील गाडी ही स्फोट करण्यासाठी वापरली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
दिल्लीमधील या बॉम्बस्फोटमध्ये २४ जण जखमी झाले असून जखमींना एलएनजेपी रुग्णालयात दाखल केले असून तपास सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसर एका सदम्यामध्ये गेला आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे ह्रदयद्रावक विंध्वस सांगितला आहे. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्थानक गेट क्रमांक १ च्या जवळ झाल्याचे म्हटले जात आहे. प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले की स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की इमारतीच्या खिडक्या उघडल्या. एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की आपण दुकानात बसला असता अचानक इतका मोठा धमाका झाला की हादऱ्याने खुर्चीतून आपण खाली पडलो. आयुष्यात इतका भयानक धमाका कधी ऐकला नाही असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, या घटनेचा आवाज अत्यंत मोठा होता. आम्ही लांब होतो त्यानंतर आम्हाला पोलिसांनी सतर्क केले की असा स्फोट झाला आहे. यानंतर घटनास्थळाहून गाड्या काढण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर तिथे काहीच उरले नव्हते. कार आणि गाड्यांचा चक्काचूर झाला होता. तर काही लोकांची शरीर पूर्णपणे उद्धवस्त होऊन पडली होती. काही लोकांचे अर्धे मृतदेह हे बाहेर काढण्यात आले. असे अंगावर काटा आणणारे अनुभव प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये दहशतवादी संघटना सामील असण्याची शक्यता – वाचा सविस्तर






