संसद भवनात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी (फोटो- सोशल मीडिया)
संसदेला आणि अनेक शाळांना धमकीचा इमेल
सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला तपास
संसदेची सुरक्षा वाढवण्यात आली
नवी दिल्ली: सध्याचे युग हे सोशल मिडियचे आहे. सोशल मिडियाचा चांगला वापर करण्याऐवजी काही जण धमकी देणे,घाबरवणे असा वापर करताना दिसून येतात. आज सकाळीच राजधानी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांना आणि संसदेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे शाळा आणि संसद भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित शाळा आणि संसद भवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या ईमेलमध्ये दिल्ली खलिस्तान बनणार आणि 13 तारखेला संसदेत मोठे हल्ले केले जातील असे सांगण्यात आले आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे.
संसद भवनावर हल्ल्याची धमकी
राजधानी दिल्लीत असणाऱ्या संसद भवनात बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासाठी 13 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी ला दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संसदेत बॉम्ब स्फोट होईल. या ईमेलमध्ये हिंदुस्थानची संसद असा उल्लेख करण्यात आला आहे. अफजल गुरुच्या आठवणीत हल्ला करण्याचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. तपास सुरू करण्यात आला आहे.
‘कोर्टात RDX ठेवले…’; देशातील ‘या’ न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; न्यायमूर्ती अन्…
ईमेलमध्ये कशाचा उल्लेख?
ईमेल पाठवणाऱ्याने स्वतःला ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’चा सदस्य असल्याचे म्हटले आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना खलिस्तानचा शत्रू असे संबोधण्यात आले आहे. यामध्ये पंजाब खलिस्तान आहे आणि आता दिल्ली खलिस्तान बनेल असा देखील उल्ले ख करण्यात आला आहे.
दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..!
राजधानी दिल्लीहून बागडोगरा येथे जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी आढळली. यामुळे रविवारी विमानामध्ये खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव, विमान ताबडतोब लखनौला वळवण्यात आले. या धमकीमुळे विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करण्यात आले. यानंतर बॉम्ब निकामी करणारे पथक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबा घेतला आणि कसून तपासणी केली. दिल्लीहून बागडोगरा (पश्चिम बंगाल) येथे जाणाऱ्या विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करावे लागले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानामध्ये बॉम्ब असल्याची चिठ्ठी सापडली. हे विमान इंडिगोचे होते. विमानाच्या वॉशरुममध्ये टिशू पेपरवर या विमानामध्ये बॉम्ब असल्याचे लिहिण्यात आले होते.






