पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन बिहारी जनतेला मतदानाचे आवाहन केले (फोटो - सोशल मीडिया)
PM Modi on Bihar Elections Voting: बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बिहारमध्ये आज (दि.06) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सकाळपासून मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे. आधी मतदान नंतर नाष्टा करा असे देखील पंतप्रधान मोदी बिहारी जनतेला म्हणाले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीए यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जोरदार प्रचार आणि भाषणानंतर भाजप नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, आज बिहारमध्ये लोकशाहीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. विधानसभा निवडणुकीच्या या टप्प्यात सर्व मतदारांनी पूर्ण उत्साहाने मतदान करावे असे मी आवाहन करतो. या प्रसंगी, राज्यातील माझ्या सर्व तरुण मित्रांचे विशेष अभिनंदन जे पहिल्यांदाच मतदान करत आहेत. लक्षात ठेवा: प्रथम मतदान, नंतर नाष्टा! असा मिश्किल टोला लगावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचे आवाहन केले आहे.
बिहार में आज लोकतंत्र के उत्सव का पहला चरण है। विधानसभा चुनावों में इस दौर के सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे पूरे उत्साह के साथ मतदान करें। इस मौके पर पहली बार वोट डालने जा रहे राज्य के अपने सभी युवा साथियों को मेरी विशेष बधाई। याद रखना है- पहले मतदान, फिर जलपान! — Narendra Modi (@narendramodi) November 6, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार दौऱ्यावर आहेत. इतर जिल्ह्यामध्ये ते जोरदार प्रचार करणार असून त्यांची सभा देखील होणार आहे. याबाबत पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, लोकशाहीच्या या भव्य उत्सवादरम्यान बिहारमधील जनतेचा प्रचंड उत्साह दर्शवितो की एनडीए विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व बहुमत मिळविण्यास सज्ज आहे. या उत्साही वातावरणात, मी सकाळी ११:३० वाजता फोर्ब्सगंज, अररिया आणि दुपारी १:३० वाजता भागलपूर येथे होणाऱ्या जाहीर सभांमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्यांचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी बिहार प्रचाराची उत्सुकता वाढवली आहे.
बिहार में लोकतंत्र के महापर्व में जन-जन का अद्भुत उत्साह बता रहा है कि विधानसभा चुनावों में एनडीए को अभूतपूर्व बहुमत मिलने जा रहा है। ऊर्जा से भरे इसी माहौल के बीच करीब 11.30 बजे अररिया के फारबिसगंज और दोपहर लगभग 1.30 बजे भागलपुर की जनसभाओं में अपने परिवारजनों का आशीर्वाद प्राप्त… — Narendra Modi (@narendramodi) November 6, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा






